पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होऊन तारीख १३ रोजी संध्याकाळचे पांच वाजण्याचे सुमारास किल्लेदाराने तो किल्ला इंग्लिशांचे स्वाधीन केला. इंग्लिशांनी आंग्र्यांचे १५०० लोक कैद केले. किल्ल्यांत ८ इंग्लिश व ३ ङच लोक आंग्र्यांनी कैदेत ठेविलेले होते त्यांची सुटका झाली. किल्लयांत एकंदर १.२॥ लाख रुपयांची लूट इंग्लिशांस मिळाली. नंतर इंग्लिशांनी आपली ४ जहाजे व ६०० लोक विजयदुर्ग येथे बंदोबस्ताकरितां ठेविले. तुळाजी आंग्रे मरेपर्यंत कैदेतच होता. तुळाजी कोठे मरण पावला या संबंधाने निरनिराळे लेख आहेत. एके ठिकाणी तो विजयदुर्गच्या किल्लयांत मरण पावला असे लिहिले आहे; एके ठिकाणी तो रायगडाजवळ मरण पावला असे लिहिले आहे; व एके ठिकाणी त्याला प्रथमतः सातारा जिह्यांत वंदन येथे कैदेत ठेविले होते. नंतर त्याला सोलापुरास पाठवून दिले तेथें तो मरण पावला, असही लिहिलेले आहे. तथापि त्याचे थडगे व त्याच्या सहा बायकांची थडगी विजयदुर्ग येथे बांधलेली आहेत, त्यावरून तो तेथेच मेला असावा असे वाटते. नमक आंग्र्यांचे बंड मोडण्याकरितां या वेळी पेशवे व इंग्लिश एक झालेले होते. विजयदुर्ग हाती आल्यावर तो किल्ला व तें बंदर आपले ताब्यात असावे व त्याबद्दल इंग्लिशाचें बाणकोट बंदर पेशव्यांनी घ्यावें असें इंग्लिशांनी पेशव्यांचे दरबारी बोलणे चालविले. परंतु पेशवे त्या गोष्टीस कबूल झाले नाही, त्यामुळे इ० स० १७५७ च्या आक्टोबर महिन्यांत इंग्लिशांस विजयदुर्ग पेशव्यांचे हवाली करणे माग पडले. पुढे पेशव्यांनी आपल्या तिकडील राज्याचे तें मुख्य ठाणे करून त्यांचा आरमाराचा सरदार