पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ रोजी अडमिरल वाटसन यास ती बातमी समजतांच त्याने किल्ला खाली करून द्यावा ह्मणून आंग्र्यांस निरोप पाठविला. परंतु आंतून त्यांचे काहीच उत्तर आले नाही. तेव्हां वाटसन आपली गलबतें घेऊन पुढे गेला. किल्लयांतील लोकांनी इंग्लिशांच्या आरमारावर तोफांचा भडिमार चालविला; परंतु त्यास न जुमानतां वाटसन साहेब उ. त्तरेकडील तटापासून ५० कदमांच्या अंतरावर आपली गलबते घेऊन गेला. आंग्र्यांचे आरमार किल्लयाचे पायथ्यांशी असून त्यांतील सर्व जहाजें एकमेकांस बांधून टाकिलेली होती. इंग्लिशांनी आपला तोफखाना सुरू केला त्या वेळी एक गोळा आंग्र्यांच्या आरमारापैकी एका गलबतावर पडून त्याने पेट घेतला, त्यामुळे ते सर्व आरमार जळून गेले. या वेळी आंग्र्यांची एकंदर ६९ गलबतें जळली. दुसरा एक गोळा किल्लयांतील इमारतीवर जाऊन पडल्यामुळे त्यांनीही पेट घेतला, व सर्व किल्ल्यांत आगीचा डोंबाळा होऊन गेला. इतके झाले तरी किल्लेदाराने किल्ला सोडिला नाही. आंग्र्यांचे मनांतून तो किल्ला पेशव्याचे हवाली करावयाचे होते. परंतु क्लाईव्ह साहेबास ती बातमी कळतांच तो जमीनीवर आपले लोक घेऊन उतरला व पेशव्याची फौज व किल्ला यांचे दरम्यान् त्याने आपला. तळ दिला. दुसरे दिवशी सकाळी किल्ला खाली करून देण्याविषयी वाटसन साहेबाने पुनः निरोप पाठविला. किल्लेदाराने विचार करण्याकरितां कांही वेळ मागून घेतला, परंतु तितक्या मुदतीत त्याने काहीच उत्तर पाठविलें नाही. तेव्हां किल्लयावर पुनः तोफांचा भडिमार होऊ लागला. शेवटी नाइलाज