पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११२). आंग्र्यांचे भय होतेच. तेव्हां पेशव्यांच्या मदतीने त्यांनी आंग्र्यांचे पारिपत्य करण्याचा विचार केला. त्या उभयतांत जो तह झाला त्यांत असे ठरले की, पेशव्यांनी जमिनीकडून व इंग्लिशांनी समुद्रावरून आंग्र्यांवर स्वारी करावी. इ. स. १७५५च्या दिजंबर महिन्याच्या २२व्या तारखेस कमोदार जेम्स हा विजयदुर्ग किंवा घेरिया या किल्ल्याची टेहेळणी करण्याकरितां गेला. त्या वेळी घेरिया किल्ला अतिशय दुर्गम अशी त्याची प्रसिद्धि होती. तपासणीच्या अंती पूर्वी त्या सरदाराला तो किल्ला जितका बिकट वाटला होता तितका बिकट दिसून आला नाही. त्या वेळी मुंबईस अडमिरल वाटसन याच्या हाताखाली विलायतेहून गलबतें आलेली होती, व लार्ड क्लाईव्ह याच्या हाताखाली एक जंगी स्वारांची टोळी होती. तारीख ७ अप्रील इ. स. १७५६ रोजी इंग्लशांची १२ लढाऊ जहाजें, पांच बांब जहाजें, ४ देशी गलबतें, ४० होड्या, ८०० युरोपियन लोक व ६०० काळे लोक इतकें सैन्य घेरिया किल्ला सर करण्याकरितां निघाले. प्रथमतः किल्लयांतील लोकांना बंदराबाहेर पडू देऊ नये ह्मणून इंलिशांनी काही जहाजे पुढे पाठवून बंदरांतून बाहेर पडण्याचा रस्ता रोखून टाकिला. बाकीचे आरमार तारीख ११ रोजी विजयदुर्गास येऊन पोहोंचलें. काळे लोकांनी जमिनीच्या बाजूने किल्ल्यास वेढा दिला. इंग्लिशांची कडेकोट तयारी पाहून तुळाजी आंग्र्या भिऊन गेला, व विजयदुर्ग आपल्या भावाच्या स्वाधीन करून आपण पेशव्यांच्या सरदाराच्या स्वाधीन झाला. त्या सरदाराने किल्ला खाली करून द्यावा असा हुकूम तुळाजीपासून जोराने घेतला. दुसऱ्या दिवशी झणजे तारीख