पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११) मालाने भरलेले एक गलबत, रेस्टोरेशन नावाचे एक लढाऊ गलबत, व दुसरी लहान सहान पुष्कळ गलबतें धरिली. इ० स०.१७३८ त इंग्लिशांचा सरदार कमोडर बागवेल व आंग्रे यांच्यामध्ये समुद्रांत युद्ध होऊन आंग्र्यांचे आरमार राजापुरच्या खाडीपर्यंत हटत गेले. परंतु त्यांत आंग्र्यांचे फारसे नुकसान झाले नाही. विजयदुर्ग येथे राहून आंग्रे वरचेवर बाहेरील लोकांची गलबतें धरून नेत असत. त्यांनी डच लोकांची बरीच गलबतें धरली होती. तसेच इ० स० १७४० च्या सुमारास त्यांनी फ्रेंचांचें जुपीटर नांवाचे लढाऊ जहाज धरून नेलें. या गलबतावर ४० तोफा असून फ्रेंचांचे ४०० गुलाम होते. इ० स० १७४९ त आंग्र्यांनी सर बुलियम जेम्स याच्या आरमारावर हल्ला केला. या ठिकाणी उभय पक्षांची मोठी निकराची लढाई होऊन तीत आंग्र्यांस विजयदुर्गास पळून यावे लागले, व त्यांचे फार नुकसान झाले. इ० स० १७५० त आंग्र्यांनी पुनः कमोदर लिसल याच्या हाताखालील आरमारावर हल्ला केला. हे आरमार फार मोठे होतें, व त्यांत विजिलंट नांवाचे एक जहाज असून त्यावर ६४ तोफा होत्या, व दुसरे रुबी नांवाचें जहाज असून त्यावर ५० तोफा होत्या. इ० स० १७५४ त आंग्र्यांनी डच लोकांच्या तीन जहाजांवर हल्ला करून त्यांपैकी दोन बुडविली, व एक धरून आणिलें. त्यांपैकी एकावर ५० दुसऱ्यावर ३६ व तिसऱ्यावर १८ तोफा होत्या. ह्या विजयामुळे आंग्र्यांस जोर येऊन त्यांनी आपलें आरमार ज्यास्त वाढविले. या पूर्वीच आंग्रे व पेशवे यांच्यामध्ये काहीं तेढ उत्पन्न झाली होती.मुंबईसुरकारास