पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व सर्व व्यापारी मंडळ्यांस आंग्रयांची अतिशय दहशत बसून गेलेली होती. केवळ आंग्र्यांपासून आपणांस त्रास पोहोचूं नये एवढ्याच कामाकरितां इंग्लिशांनी त्या वेळी एक निराळेंच आरमार ठेविलें होतें. इ० स० १७१७ च्या एप्रिल महिन्यांत इंग्लिशांचे आरमार विजयदुर्ग किल्ल्यावर चाल करून गेले. या आरमाराबरोबर इंग्लिशांचे पुष्कळ घोडेस्वार होते. इंग्लिशांनी किल्ल्याचा तट फोडण्याकरितां आपला तोफखाना सुरू केला. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. इंग्लिशांनी किल्ल्यावर हल्ला केला, परंतु आंग्र्यांनी त्यांना पिटाळून लाविले. या स्वारीत इंग्लिशांचे अतिशय नुकसान झालें, व त्यांचे आरमार विजयदुर्ग येथून पळून गेले. नंतर तीन वर्षांनी म्हणजे इ० स० १७२० त इंग्लिश व पोर्तुगीज हे दोघे मिळून त्यांनी विजयदुर्गावर हल्ला करून आंग्र्यांची १६ लढाऊ गलंबतें फोडून टाकिली; त्यांनी किल्ल्याच्या तटाला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या कामांत त्यांना यश आले नाही. या स्वारीत वालटर ब्राऊन हा इंग्लिश अमलदार होता. त्याच वर्षाच्या एप्रिल महिन्यांत आंग्र्यांनी इंग्लिशांच्या चारोटी नांवाच्या लढाऊ जहाजावर हल्ला केला. गलवतावरील लोकांनी आपली शिकस्त केली. परंतु आंग्रयांच्या लोकांनी त्यांचा पराभव करून ते गलबत विजयदुर्ग येथे आणिले. इ० स० १७२४ त बटेविया येथून डच लोकांनी विजयदुर्गावर आपले आरमार पाठऊन दिले. परंतु आंग्र्यांनी त्याचा पराभव करून त्यास पिटाळून लाविलें. इ० स० १६३६ त आंग्र्यांनी इंग्लिशांचे डरबी नांवाचें