पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०९) किल्ला फार मजबूत असून फार प्रसिद्ध आहे. हा किल्ला एका खडकावर बांधलेला आहे. समुद्राच्या बाजूने पाहिले तर सकृद्दर्शनी हा किल्ला फार मजबूत असावा असा तर्क होत नाही. खाडीच्या बाजूने या किल्लयाची चढण सुमारे १०० फूट आहे. त्याचा तट अतिशय मजबूत असून त्याला २७ बुरूज आहेत. पश्चिमेकडील तटावर त्याची दागदुजी नसल्यामुळे समुद्राच्या लाटा नेहमी आदळत असल्यामुळे त्याला काही ठिकाणी खिंडारें पडली आहेत, व त्यावर मोठमोठी झाडेझुडपे वाढून त्यांची पाळेमुळे तटांत शिरल्यामुळे तो ढिला झाला आहे. किल्ल्याचा तट तिहेरी असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे २० एकर आहे. त्तटावर झाडेझुडपें बरीच वाढलेली आहेत. या किल्ल्यांत उत्तम पाण्याच्या विहिरी, व वसति करण्यासारख्या इमारतीही बऱ्याच आहेत. या किल्ल्याच्या एकंदर स्थितीवरून पाहतां तो फार प्राचीन असावा असा तर्क होतो. प्रथमतः विजपुरच्या बादशाहांनी तो वाढविला. पुढे इ० स० १६५४ च्या सुमारास शिवाजीने त्याची फारच उत्तम रीतीने दागदुजी केली. किल्ल्याचा तिहेरी तट, त्याचे बुरूज, व त्यांतील भव्य इमारती इत्यादि सर्व गोष्टी शिवाजीने केलेल्या आहेत. नंतर सुमारे ४० वर्षांनी म्हणजे इ० स० १६९८ त मराठ्यांच्या आरमाराचा सरदार कान्होजी आंग्रे याने १५० मैल लांब व ४० पासून ६० मैलांपर्यंत रुंद एवढा कोंकणपट्टीचा प्रदेश आपले अमलांत आणून त्या प्रांताचें मुख्य ठाणे विजयदुर्ग येथे ठेविले. सुमारे २० वषपर्यंत आंग्र्यांनी समुद्रावर आपली सत्ता अनियंत्रित चालविली,