पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करितां याच बुरुजावर बावटा लावण्याकरितां एक उंच काठी पुरलेली आहे. . बालेकिल्ल्यांतील भगवती देवीचा डत्साह नवरात्रांत होत असतो, त्या वेळी तेथे बरीच यात्रा जमते. या देवीचे जे मानकरी आहेत, त्यांत तिचा भालदार मुसलमान आहे, व त्याबद्दल त्याला मराठ्यांच्या वेळेपासून सनद मिळालेली आहे. किल्लयांतील मराठ्यांच्या बायका मोठ्या उद्योगी असून दररोज सडीक बांदूळ तयार करून ते रत्नागिरी शहरांत आणून विकतात व त्या धंद्यावर आपला उदरनिर्वाह करितात. २१.विजयगड:--हा किल्ला शास्त्रीनदीच्या किंवा जयगडच्या खाडीच्या उत्तरतीरावर जयगडापासून २ मैलांवर नदीच्या पलीकडे आहे. हा किल्ला फारच लहान आहे. याच्या तीन बाजूंस खंदक आहे. आंत एक निरुपयोगी जुनी तोफ आहे. त्याची बहुतेक पडापड झालेली आहे. धान्य व पाणी यांचा पुरवठा आसपासच्या खेड्यांतून होण्यासारखा आहे. राजापुर तालुका२२ आंबोळगड. हा किल्ला जैतापुरच्या खाडीच्या मुखाशी उत्तरेच बाजूस आहे. समुद्राच्या सपाटीपासून थोड्याशा उंचवट्याच्या जागेवर हा किल्ला बांधलेला आहे. त्याच्या उत्तर व पश्चिम या दोन बाजूंस खंदक आहे. किल्लयाचे क्षेत्रफळ १२१० चौरस यार्ड आहे. इ०स० १८१८ त कर्नल इम्लाक याने हा किल्ला मराठयांपासून घेतला. इ० स० १८६२. त या किल्लयांतील घरें, त्याचा तट, त्याचे बुरूज या सर्वांची -:.:.