पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७०.) पडापड झालेली होती. या किल्लयाचे संबंधानें ऐतिहासिक अशी काहीच माहिती उपलब्ध नाही. परंतु जैतापुरच्या खाडीचे मुख त्याच्या माऱ्यांत असल्यामुळे मराठयांचे वेळी त्याचा फार उपयोग झाला असेल असे वाटते. रत्नागिरी जिल्ह्यांतील प्रत्येक खाडीच्या मुखाशी एक किल्ला आहेच. २३यशवंतगड. हा किल्ला राजापूर किंवा जैतापूर या खाडीच्या उत्तरेकडील तीरावर तिच्या मुखाशी आहे. दक्षिणेच्या बाजूस समुद्र आहे, व उत्तर व पश्चिम या बाजूस खंदक आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे सात एकर आहे. किल्लयाच्या तटाला एकंदर १७. बुरूज आहेत. इ० स० १८६२ त . किल्ल्यांची जी पहाणी झाली, त्या वेळी किल्लयाचे दरवाजे व त्याची तट मोडकळीस आलेला होता, व आंत २८ निरुपयोगी जुन्या तोफा पडलेल्या होत्या. हल्लीही या किल्लयावर कांहीं तोफा पडलेल्या आहेत, व त्याचा तटही नादुरुस्त झालेला आहे. आंत पाण्याचा वगैरे चांगला पुरवठा आहे. येथें इतिहासप्रसिद्ध अशी विशेष गोष्ट घडून आल्याचे दिसत नाही. २४ राजापुरचा किल्ला--हा किल्ला राजापुरच्या किंवा जैतापुरच्या खाडीच्या कांठी राजापूर शहरांत बांधलेला आहे. त्याला किल्ला म्हणण्यापेक्षां गढी असे म्हटले तर चांगलें शोभेल. हल्ली या गढीत मामलेदाराची कचेरी आहे. ही गढी साधारण उंचवटयाच्या जागी बांधलेली असून पूर्वी तिच्या दक्षिणेकडील बाजूस खंदक होता. हल्ली तो खंदक भरून गेलेला आहे. . या गढीचा तट मजबूत असून तिला दोन बुरूज आहेत. ती इ० स० १८१८ त कर्नल इम्लाक साहेबाने घेतली. इ० स०