पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०५). दरम्यान् जी भिंत आहे ती व बालेकिल्ल्याची काही तटबंदी हा होय. हे काम बहामणी राजांच्या कारकीर्दीत (इ० स० १३४३-१५००) झाले अशी दंतकथा सांगतात. परंतु तिकडील प्रदेश बहामणी राजांच्या तां. ब्यांत होता असा दाखला कचितू सांपडतो. तेव्हां तें काम विजापुरच्या राजांनी (इ.स.१५००-१६६० )बांधलें असावे असे अनुमान होतें. इ० स १६७०त शिवाजीने हा किल्ला जिंकून घेतला, व त्याने बाहेरच्या मुख्य कि-. लयाचे काम केलें, व त्याच्या संरक्षणाकरितां ह्मणून मिया डोंगरावर एक व हल्ली अदालत किंवा डिस्ट्रिक्ट जज्जाची कचेरी आहे तेथे एक असे दोन मजबूत बुरूज बांधले. ज्या बुरुजावर हल्ली दीपगृह आहे, त्याला सिद्दबुरूज असे म्हणतात. याचे कारण असे आहे की, एकदा विजयदुर्ग. च्या धुलपाशी लढाई चालली असतां किल्लयाचा सिद्दी सरदार त्या बुरुजावर पडला... बालेकिल्लयाची विशेष मजबुती आंग्र्यांनी केली असे सांगतात (इ. स.१७१०-१७५५). इ० स०१८६२त या किल्ल्याची स्थिति बरीशी नसून आंत ११७ निरुपयोगी तोफा पडलेल्या होत्या. हल्लीही या किल्लयाची तीच स्थिति आहे. रत्नागिरीच्या बंदरांत खडक असल्यामुळे खलाशी लोकांस त्याची वर्दी मिळावी म्हणून रत्नागिरी किल्लयाच्या अगदी पश्चिम टोकावर सिद्दबुरुजाबर इंग्लिश सरकाराने एक दपिगृह ठेवलेले आहे. या दपिगृहाची उंची समुद्रापासून सुमारे ३०० फूट आहे. त्यांत रात्रीस दिवा जळत असतो. हा दिवा सुमारे १० मैलांवरून दिसतो. रत्नागिरी येथील आगबोटीवर जाणाऱ्या उतारूंस वर्दी देण्या