पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वठा असेल तर शत्रूला दाद न देतां पुष्कळ दिवस तेथें वग काढितां येईल. त्याची तटबंदी अतिशय मजबूत आहे. आंत जाण्यास फक्त एकच दरवाजा आहे. परंतु तो फार मजबूत आहे, उत्तर व पश्चिम या दिशांस तुटलेले भयंकर कडे असल्यामुळे त्या बाजूस तटबंदी नाही, व बाकीच्या दोन बाजूंची तटबंदी फारच भक्कम रीतीने बांधलेली आहे. हल्ली या तटबंदीचा काही भाग ढांसळला आहे. आंत भगवतीचे देवालय असून त्याला सालीना सरकारांतून ५२ रुपयांची नेमणूक आहे. देवालयाशिवाय आंत एक लहानसे तळे, एक खोल विहीर, व एक अतिशय जुनाट पिंपळाचा वृक्ष आहे. विहीरीचे पाणी उन्हाळ्यांत आटते. पिंपळाचा वृक्ष खालच्या सपाट प्रदेशापासून जरी सुमारे ३०० फूट उंचीवर निवळ खडकावर वाढलेला आहे तरी तो नेहमी विलक्षण टवटवीत दिसतो. किल्लयाच्या पायथ्याशी नैऋत्य व वायव्य कोपन्यांत कांही बोगदे आहेत. व त्यांतून वर किल्लयांत जातां येते असे सांगतात; व कदाचित ती गोष्ट खरीही असेल. कारण ज्या ठिकाणी किल्लयांत विहीर आहे तेथून उत्तम पायऱ्या बांधलेले असें एक भुयार असून तो रस्ता वर सांगितलेल्या बोगद्यांत जाऊन मिळत असावा असा पुष्कळ संभव आहे. किल्ला कदाचित् शत्रूच्या हातांत जाण्याचा प्रसंग आला तर आपली सुटका करून घेतां यावी एवढयाकरितां ती तजवीज केलेली असावी असे वाटते. . किल्ल्याच्या बांधणीचे काम कांहीं मुसलमानी त-हेचें व कांही मराठी त-हेचे आहे. किल्ल्याचा मूळचा भाग मटला ह्मणजे बालेकिल्ल्याचा पायथा व किल्लाबंदर यांचे