पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उंच व रुंद तट घातलेला आहे... दीपगृहापासून बालेकिल्लयापर्यंतची उत्तरेच्या आंगची बाजू सखल होत गेलेली आहे. या बाजूने एकसारखा तुटलेला कडा आहे. ज्या ठिकाणी कड्याची उंची अगदी कमी झालेली आहे, तेथे मात्र तटबंदी केलेली आहे. पुढे बालकिल्ला लागतो. ज्या टेकाडावर बालेकिल्ला बांधलेला आहे, तें मुख्य डोंगरापासून अगदी अलग आहे. उत्तरेच्या बाजूस. मुख्य किल्ल्याची बाजू व बालेकिल्ला यांचे दरम्यान् जेथें समुद्राचे फासूं आहे, तेथें किनाऱ्याच्या बाजूनें अतिशय मजबूत, रुंद व उंच असा तट घातलेला आहे. ह्या तटाला ठिकठिकाणी बुरूज ठेविलेले आहेत. बंदराच्या तोंडाशींच किल्लयांतील लोकांची वस्ती असून जेथें वरव्याची जागा आहे तेथे एक भक्कम दरवाजा आहे. ही सर्व तटबंदी धोंडो भास्कर प्रतिनिधि याने इ० स० १७९० च्या सुमारास बांधली, अशी दंतकथा सांगतात. उत्तर दिशेकडून पूर्वेकडे निघालें म्हणजे पुनः चढाव सुरू होतो, व त्या बाजूने खालच्या भागापासून वर डोंगराच्या माथ्यावर येईपर्यंत एकसारखी भिंत बांधलेली आहे. या ठिकाणी एक मोठा भक्कम बुरूज बांधलेला आहे, व तेथून डोंगराच्या माथ्यावरून मुख्य दरवाज्यापर्यंत एकसारखा मजबूत तट घातलेला आहे. तर क बालेकिल्ला मुख्य किल्लयापासून अगदी अलग असून त्याचे क्षेत्रफळ ६॥ एकर आहे. ज्या टेकाडावर हा किल्ला बांधलेला आहे, त्याचा माथा सपाट असून ते मुख्य किल्ल्याच्या उत्तर दिशेस आहे. मुख्य किल्ला शत्रूच्या हातांत गेला, तथापि बालेकिल्लयांत सामानसुमानाचा पुर