पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०१) २०० फूट उंच असून पश्चिमबाजू ३०० फूट उंच आहे. अगदी पश्चिमेकडील कोपन्यापासून ह्मणजे हल्ली जेथें दीपगृह आहे तेथून उत्तरेकडे निघाले ह्मणजे समुद्राच्या बाजूकडील तुटलेल्या कडयाची उंची. कमी होत होत १०० फुटांपर्यंत कमी होते व तेथून एकदम पुन: डोंगर वाढत गेलेला आहे. ह्या डोंगरालाही मजबूत तटबंदी केलेली आहे. त्याची उंची सुमारे २०० फूट आहे. याला बालेकिल्ला असें ह्मणतात: मुख्य किल्लयाची उत्तरबाजू व बालेकिल्लयाची दक्षिणबाजू यांच्यामधील प्रदेश अंतगोल असून समुद्राने वेष्टित आहे. याला किल्लाबंदर असें म्हणतात. त्याला लागून किल्लयांत एक लहानसे खेडे आहे. तेथील पाणी सर्वोत्कृष्ट असून तेथे माड व इतर झाडे पुष्कळ आहेत. किल्लयांत ब्राह्मण, परभू, मराठे, भंडारी, मुसलमान, दालदी, सुतार, तेली, न्हावी, कुळवाडी, गुरव वगैरे लोकांची सुमारे ४०५० घरे आहेत. हे लोकं पूर्वीच्या गडकरी लोकांचे वंशज आहेत. _ या किल्ल्याचे बाहेरला व आंतला असे दोन भाग. आहेत. किल्ल्यांत जाण्याचा रस्ता आग्नेयी दिशेकडून रत्नागिरी शहरांतून येतो. त्याचा दरवाजा साधारण मध्यावर असून त्याचे तोंड रत्नागिरी शहराकडे आहे. हा दरवाजा दुरुस्त असून त्याला बाहेरच्या बाजूने मोठमोठे लांब चोंचीचे खिळे मारलेले आहेत. पूर्वी किल्ल्यांतील लोकांची वाग याच दरवाज्याने असे. परंतु अलीकडे वर सांगितलेल्या दरवाज्याच्या काहीसे अलीकडे डोंगर फोडून फार उत्तम सडक बांधली आहे. मुख्य दरवाज्याच्या पश्चिम बाजूस दीपगृहापर्यंत मोठा मजबूत