पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०१) पश्चिमेस समुद्राकडचे बाजूस प्रसिद्ध कराटेश्वराचे देवा• लय आहे. १९ पूर्णगड. हा किल्ला मुचकुंदी नदी किंवा पूर्णगडची खाडी हिच्या मुखाशी रत्नागिरीच्या दक्षिणेस बारा मैलांवर एका समुद्रकिनाऱ्याला लागून असणाऱ्या टेकडीवर बांधलेला आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे २२ एकर आहे. या किल्लयाचे आवारांत जी भातशेती आहे तिचें उत्पन्न पेशव्यांच्या कारकीर्दीत गडकरी लोकांना इनामादाखल दिलेलें होतें. इ० स० १८२९ त इंग्लिशांनी गडकरी लोक काढून टाकिले, तथापि त्यांच्याकडे किल्लयांतील लागवडीची जमीन इनामी म्हणून कायम राहिली. किल्लयाचा सुमारे तीस फूट लांबीचा भाग कोसळून पडल आहे. बाकीचा सर्व किल्ला अद्यापि फार चांगल्या स्थि. तीत आहे. किल्लयांत कांहीं तोफा व कांहीं गोळे पडलेले आहेत. किल्ल्याचे तोंडाशी एक मारुतीची भव्य मूर्ति बसविलेली आहे. या किल्लयावरून आसमंतात् भागच्या प्रदेशाचा देखावा फार रमणीय दिसतो. शिवाजीने जे किल्ले बांधले त्यांत हा शेवटी बांधला व त्याचे नांव पूणेगड असें ठेविले अशी दंतकथा सांगतात. २० रत्नागिरीचाकिल्ला. हा किल्ला रत्नागिरी बंदराच्या उत्तरबाजूस एका उंच डोंगरावर बांधलेला आहे.. या किल्लयाची लांबी १३२७ यार्ड व रुंदी सुमारे १००० यार्ड असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे १२० एकर आहे. या किलयाच्या तीन बाजूंनी समुद्र आहे. फक्त आग्नेयी बाजूस समुद्र नाही. ज्या डोंगरावर हा किल्ला बांधला आहे तो साधारण पूर्वपश्चिम असून त्याची पूर्वबाजू. पायथ्यापासून