पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकांच्या सत्तेचा हास झाल्यावर हे सर्व किल्ले मराठ्यांचे अमलाखाली आले (इ० स० १७३९-४०.) नंतर इ० स० १७७४ त यांपैकी काही किल्ले इंग्लिशांनी मराठ्यांपासून जिंकून घेतले, व इ० स०१८१८ त पेशवाई बुडाच्यावर बाकीचे त्यांच्या हाती आले. इंग्लिशांचे हाती हे किल्ले आले तेव्हां ते सर्व नादुरुस्त होते. त्यापूर्वीच्या वीस वर्षांत त्यांच्या दुरुस्तीकडे एक कवडीही खर्च झालेली नव्हती, व आंत झाडेझुडपे वाढलेली होती किनाऱ्यावरील काही किल्ले साधारण बऱ्या स्थितीत होते. इंग्लिशांचे हाती ते आल्यावर त्यांनी किनाऱ्यावरील किल्ल्यांस फारसा हात लाविला नाही, परंतु अंतःप्रदेशांतील बहुतेक किल्ले पाडून टाकिले. वसई, अरनाळा, तारापूर, गोरखगड, सिधगड वगैरे किल्ल्यांवर काही दिवस इंग्लिशांनी आपली शिबंदी ठेविली होती. परंतु पुढे लवकरच त्यांनी आपले सैन्य तेथून काढून टाकिलें, व तेव्हापासून आजमितीपर्यंत ते सर्व ओसाड पडलेले आहेत, व कांहीतर नामशेष झालेले आहेत. त्यांचे तालुकेनिहाय वर्णन येणेप्रमाणे: डहाणू तालुका. -:०*०: या तालुक्यांत एकंदर ८ किल्ले आहेत; त्यांपैकी ४ समुद्रकिना-यावर व ४ अंतःप्रदेशांत आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील ४ किल्ले. १ डहाणू. हा किल्ला डहाणू नदीच्या मुखापासून काही अंतरावर तिच्या उत्तर तीरावर बांधलेला आहे.