पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२) ५ भिवडी, ६ शाहापूर, ७ साष्टी, ८ कल्याण, क ९ मुरबाड. ठाणे जिल्ह्यांतील किल्ल्यांचे साधारण वर्णन.-- ठाणे जिल्ह्यांत एकंदर ४० किल्ले आहेत, व त्यांचे तीन भाग करता येतील. पहिल्या भागांत समुद्रकाठी असणारे किल्ले मोडतात. यांची संख्या १९ आहे-डहाणू तालु. क्यांत ४ ( डहाणू , दिडू, संजान व उंबरगांव. ) माहीम तालुक्यांत ७ ( अलिबाग, भवनगड, दातिवरें माहीम, पाणकोट, शिरगांव आणि तारापूर.) वसई तालुक्यांत ३ ( अरनाळा, वसई व खारबाव. ) साष्टी तालुक्यांत ५ (बेलापूर, धारावी, परसिक, ठाणे व वरसोवा.) कल्याण तालुक्यांत १ (कल्याण.) दुसरा भाग म्हणजे अंत:प्रदेशांतील किल्ले. हे एकंदर सोळा आहेत. त्यांपैकी डहाणू तालुक्यांत ४ ( बल्लाळगड, गंभीरगड, इंद्रगड, आणि सेगवाह.) माहीम तालुक्यांत ६ ( असाव, अशेरी, काळदुर्ग, मानोर, टकमक व तांदुळवाडी.), वाडे तालुक्यांत १ ( कोंज.), वसई तालुक्यांत २ ( जिवधन व कमानदुर्ग.), भिवडी तालुक्यांत १ ( गूमतारा.), शाहापूर तालुक्यांत २ (भोपटगड व माहुली.) तिसरा भाग म्हणजे सह्याद्रीतील किल्ले. हे ५ आहेत. त्यांपैकी शाहापूर तालुक्यांत १ (बलवंतगड.) सुरबाड तालुक्यांत ४ (बाहरवगड, गोरखगड, नलदुर्ग व सिंधगड. ) ह्यांपैकी बहुतेक किल्ले मुसलमान लोक किंवा पोर्तुगीज लोक यांनी इ० स० १३०० पासून इ० स० १६०० च्या दरम्यान बांधलेले आहेत. सतराव्या शतकांत या बहुतेक किल्ल्यांची शिवाजीनें नीट दुरुस्ती केली होती. पोर्तुगीज