पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१००) किल्ल्यांतील लोक हल्ली याच विहिरीचे पाणी पितात. इ० स० १८६२ त या किल्ल्यावर चार पोलीसच्या शिपायांचे एक गेट होते, व ५५ निरुपयोगी जुन्या तोफा होत्या. जयगडच्या समोरासमोर सुमारे दोन मैलांवर खाडीच्या पलीकडे डोंगरावर विजयगड नावाचा एक लहानसा . किल्ला आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे पाव एकर असून त्याच्या तीन बाजूंस खंदक आहे. आंत पाणी . वगैरे कांही नाही. इ० स० १८६.२त त्याची बहुतेक पडापड झालेली होती व आंत एक निरुपयोगी तोफ पडलेली होती. जयगड हा किल्ला विजापुरच्या बादशाहांनी सोळाव्या शतकांत बांधला असे सांगतात. पुढे त्याच शतकाच्या अखेरीस नाईक नांवाचा चांचे लोकांचा एक सरदार संगमेश्वर येथे रहात असे, त्याने तो विजापुरकरांपासून घेतला. हा नाईक बराच प्रबल होता. विजापुरकरांनी पोर्तुगीज लोकांच्या मदतीने इ० स०१५८३त व इ०स० १५८८ त त्याच्यापासून जयगड परत घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने त्या दोघांस दाद दिली नाही. पुढे कान्होजी आंग्र्याने तो किल्ला सर केला. इ० स० १७१३. त कान्होजी बाळाजी विश्वनाथ याच्या मध्यस्थीने शाहूमहाराजांच्या पक्षास मिळाला, त्या वेळी महाराजांनी कान्होजीला जे दहा अवघड किल्ले दिले, त्यांत या किल्ल्याचे नांव आहे. इ० स० १८१८त लढाईचा वगैरे प्रसंग न येतां हा किल्ला इंग्लिशांचे हाती आला. _ हल्ली किल्लयांत दोन उत्तम इमारती असून मुलकी कामगार स्वारीमध्ये तेथे गेले झणजे त्यांत राहतात. किल्लयाचे