पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रत्नागिरी तालुका१८ जयगड. हा किल्ला शास्त्री नदीच्या मुखाशी समुद्र किनान्याला लागून सुमारे दोनशे फूट उंचीच्या एका टेंकंडीवर बांधलेला आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे ९९ मैलांवर असून त्याचे क्षेत्रफळ अजमासे ४. एकर आहे. त्याच्या तटाचा फार थोडा भाग व.एक दोन बुरूज शिवाय करून बाकीचा भाग अद्यापि फार चांगल्या स्थितीत आहे. टेकडीच्या माथ्यावरलि तटबंदी फार मजबूत आहे व तिच्या संरक्षणाकरिता टेकडीच्या पायथ्याशी समुद्रकिनाऱ्याच्या बाजूनही बळकट तट घातलेला आहे. तसेंच टेकडीच्या माथ्यापासून खालच्या तटबंदीपर्यंत मध्यंतरी एक भिंत घातलेली असून तिला बुरूज घातलेले आहेत. वरचा किल्ला व पायथ्याशी जी तटबंदी आहे तिच्यांत येणारा भाग यांचे क्षेत्रफळ फारच मोठे आहे. हल्ली या जागेत तेथील रहिवाशी लोकांच्या थोड्या. शा झोपड्या आहेत. किल्लयाचा वरचा भाग शिवाजीनें बांधला. या भागांत उत्तम इमारती असून पाण्याच्या वि. हिरीही फार चांगल्या आहेत. समुद्रकाठी जी तटबंदी आहे, तिला एक चोरदरवाजा आहे. किल्ल्याच्या पूर्वेकडील उतरणीवर खालपासून वरपर्यंत एकसारख्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. या चढून वर गेलें म्हणजे किल्लयाचा मुख्य दरवाजा लागतो हल्ली किल्लयाच्या तटावर बरीच झाडेझुडपें वाढलेली आहेत व त्यांची पाळेमुळे आंत शि. रल्यामुळे त्याची पडापड सुरू झाली आहे. हल्ली जेथे गलबतें लागतात तेथे दोन उत्तम पाण्याच्या विहिरी आहेत. त मध्यतरावा याच