पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ल्लयावर पाण्याचा पुरवठा मुळीच नाही. इ. स. १८६२ त एकंदर किल्लयांची तपासणी झाली त्या वेळी हा किल्ला अगदी मोडकळीस आलेला होता व आंत फक्त एक निरुपयोगी जुनी तोफ पडलेली होती... १६ मैमतगड: हा किल्ला सह्याद्रीच्या एका अतिशय उंच व अवघड अशा शिखरावर बांधलेला आहे. हा किल्ला संगमेश्वर तालुक्यांतील निगुडवाडी नांवाच्या एका त्याचे क्षेत्रफळ सुमारे ६० एकर आहे. या किल्लयांत पाण्याचा वगैरे मुळीच पुरवठा नाही. परंतुं धान्याचा वगैरे पुरवठा आसपासच्या खेड्यापाड्यांतून होण्यासारखा आहे. इ. स. १८६२ त या किल्लयाची सर्वत्र पडापड झालेली होती व आंत चार जुन्या निरुपयोगी तोफा पडलेल्या होत्या. १७ उचितगड किंवा प्रचितगड.--हा किल्ला संगमेश्वर तालुक्यांत शृंगारपूर नांवाच्या खेड्याशेजारी सह्याद्रीच्या एका फांट्यावर बांधलेला आहे. ह्या किल्ल्याच्या एका 'अंगास मळे घाट व दुसऱ्या अंगास दक्षिण तिवरा घाट आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे तीन चार एकर आहे. शिड्या लावल्याशिवाय या किल्लयांवर चढतां येत नाही.. आंत पाण्याचा वगैरे कांहींच पुरवठा नाही. इ. स १८६२ त त्याची बहुतेक पडापड झालेली होती व आंत चार निरुपयोगी जुन्या तोफा पडलेल्या होत्या. इ. स. १८१८ च्या जानेवारी महिन्यांत कर्नल प्रोथर याने हा किल्ला मराठ्यांपासून घेतला.