पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९७). ल्लयाची पहाणी केली त्या वेळी त्याचा तट व बुरूज यांची बहुतेक पडापड झालेली होती, व त्यावर २२ निरुपयोगी जुन्या तोफा होत्या. हा किल्ला स्वतःसिद्ध मजबूत नाही किंवा त्याचे बांधकामही मजबूत नाही. किल्लयाला दोन दरवाजे असून एक उत्तरेच्या बाजूस व दुसरा पूर्वेच्या बाजूस आहे. दक्षिणेकडील भिंतीत एक मूर्ति बसविलेली आहे तिला रेडजाजी असें ह्मणतात. . हा किल्ला इ. स. १६९० च्या सुमाराप्त जंजिन्याच्या हबशाने बांधला अशी तेथील लोक दंतकथा सांगतात. परंतु हबशाने हा किल्ला नवीन बांधला नसून त्याची फक्त दुरुस्ती केली असावी असे वाटते. कारण रेडजाजीची मूर्ति जेथें बसविलेली आहे, तें काम इ. स. १६९० च्या पूर्वीचे दिसते. तेव्हां हा किल्लां हिंदू लोकांनी त्या पूर्वी बांधलेला असावा. कदाचित् शिवाजीनेच हा किल्ला बांधला असेल. नंतर त्याचे स्वामित्व हबशाकडे गेले. पुढे इ. स. १७४४ त तो किल्ला हबशाकडून आंग्रयांनी घेतला. नंतर इ. स. १७५५ त त्याचे स्वामित्व पेशव्यांकडे आले, व पेशव्यांपासून इ. स. १८१७ त तो इंग्लिशांनी घेतला. आंत. जुन्या इमारतींचे कांहीं पाये आहेत, व ४८ फूट लांब, ४४ फूट रुंद व २२ फूट खोल असा एक तलाव आहे. संगमेश्वर तालुका. -:

--

१५ भवनगड.- हा किल्ला संगमेश्वर तालुक्यांत चिखली नांवाच्या खेड्याशेजारी आहे. तो अतिशय लहान आहे, ह्मणजे त्याचे क्षेत्रफळ अवघे अर्धा एकर आहे. या कि