पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

किल्ल्यावर इंग्लिशांचे २०० काळे लोक, व दोन कामदार एवढी शिबंदी होती. पुढे ही शिबंदी तेथून काढून दापोलसि नेली. इ. स. १८६२ त या किल्लयावर एकंदर ८८ तोफा होत्या. परंतु त्या निरुपयोगी होत्या. अद्यापिही कांहीं तोफा शिलक आहेत. १३ बहिरवगड.:-हा किल्ला सह्याद्रीच्या एका उंच व बिकट अशा फांठ्यावर बांधलेला असून तो चिपळूण तालुक्यांत मोडतो. वर जाण्याचा रस्ता फारच अवघड आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे आठ एकर आहे. किल्यांतील जागा खडकाळ व उचसखल असून ती कांटेरी झाडांनी भरून गेलेली आहे. किल्लयांत पाण्याचा पुरवठा चांगला आहे. परंतु आसपास धान्यसामग्री मिळण्यासारखी नाही. या किल्ल्याला रखवालदार वगैरे कोणी नाही. इ. स. १८६२ त आंत जुन्या निरुपयोगी अशा चार तोफा पडलेल्या होत्या. १४ गोवळकोट * :-हा किल्ला चिपळूण तालुक्यांत आहे. तो एका साधारणशा उंच टेकडीवर बांधलेला असून तिच्या पायथ्याशी सभोवार भातशेतीची खाचरे आहेत. या किल्ल्याच्या तीन बाजूंस वासिष्टी नदी - किंवा चिपळूणची खाडी असून चवथ्या बाजूस पूर्वी खंदक होता. हल्ली तो भरून गेलेला आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे दोन एकर आहे. किल्लयांतील पाणी साचवणीचे असून एप्रिल महिन्यापर्यंत पुरते. या किल्लयांत वस्ती वगैरे काही एक नाही. इ. स १८६२ त या कि

  • तुळाजी आग्रे याने या किल्ल्यास गोविंदगड असें नांव दिले.

होते