पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हा किल्ला सोळाव्या शतकांत विजापुरच्या बादशाहांनी बांधला. तेव्हांपासून इ० स० १६६० पर्यंत तो विजापुरकरांकडे होता. पुढे त्याच वर्षी तो शिवाजीने सर केला, व त्याला काही नवा भाग जोडून तो नीट दुरुस्त केला. किल्ल्याच्या तटाच्या एका दगडावर एक फारशी शिलालेख आहे, त्याचा मतलब असा आहे की, " एखा- . द्याने नवीन इमारत बांधिली, व ती बांधीत असतां त्याला मृत्यूचे बोलावणे आले तर ती इमारत पुढे दुसऱ्याची होत नाही काय ? फक्त परमेश्वर अजरामर आहे. बाकी सर्व वस्तु नाशवंत आहेत. अखिलजगद्दीपक अशा महाराजांनी हा किल्ला बांधण्यास आज्ञा केली, त्यावरून तो बांधला. परंतु तो पाहण्यास ते जिवंत राहिले नाहीत." हा लेख जिल्हेज ता. १० हिजरी सन १११९ त (इ. स. १७०७त) लिहिला. ह्या लेखावरून हा किल्ला कोणी बांधला याचे चांगलेसें अनुमान करतां येत नाही. शिवाजीच्यामागे त्याचा पुत्र संभाजी याने या किल्लयाची नीट दुरुस्ती केली. इ. स. १६९९ त जंजिऱ्याचा हबशी खैरातखान याने मराठ्यांपासून हा किल्ला घेतला, व त्याला पडकोट म्हणून खालचे अंगास एक कोट बांधला. इ. स. १७४४त तुळाजी आंग्रे याने हबशीपासून हा किल्ला जिंकून घेतला, व बालेकोट ह्मणून एक वरच्या अंगास कोट बांधला. इ.स. १७५५त त्याचे स्वामित्व पेशव्यांकडे आले. मराठयांचे वेळी येथे एक सुभेदार रहात असे. इ. स. १८१८ त पेशव्यांचे राज्य लयास गेले. तेव्हां कर्नल केनडी याने ता. १७ मे रोजी हा किल्ला घेतला. इ. स. १८२९ पर्यंत या