पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९४) पाली चिपळूण तालुका. -:*: १२अंजनवेलचा किल्ला. हा किल्ला अंजनवेलच्या खाडीच्या दक्षिण तीरावर तिच्या मुखाशी एका डोंगराच्या उंच टोंकावर बांधलेला आहे. येथून अंजनवेल गांव अर्ध्या मैलावर आहे. या किल्लयावरून खाडीच्या मुखावर चांगला मारा लागू पडतो. किल्लयाचे एकंदर क्षेत्रफळ ७एकर आहे. त्याच्या तीन बाजूंस समुद्र असून एका बाजूस खंदक आहे. हल्ली हा खंदक भरून गेला आहे. किल्ल्याचा तट एकसारखा बांधलेला नाही. फक्त दोन ठिकाणी डोंगराच्या माथ्यापासून किनाऱ्यावरील तटापर्यंत एकसारखी भिंत बांधलेली आहे. तो तट चुन्यांत दगड बसवून अतिशय मजबूत केलेला आहे. याची उंची २० फूट व रुंदी ८ फूट आहे. किल्ल्याला एकंदर १२ बुरूज आहेत. दक्षिणेच्या बाजूस १८ फूट रुंदीचा खोल खंदक आहे. त्याला पूर्वेच्या बाजूस व पश्चिमेच्या बाजूस असे दोन दरवाजे आहेत. पश्चिमेकडील दरवाज्याच्या आंत दोन्ही अंगांस पाहारेकरी लोकांकरितां दोन देवड्या काढलेल्या आहेत. पूर्वी किल्लयांत पुष्कळ इमारती होत्या. अद्यापिही कांहीं कांहीं घरांच्या खाणाखुणा दृष्टीस पडतात. मांत पाण्याच्या तीन विहिरी असून त्यांना पाणीही- वि. पुल आहे. या विहिरीचे जवळ एक इमारत आहे, ती पूर्वीची कोठीची जागा होती असे सांगतात. तिला लागूनच धान्याच्या कोठीची जागा आहे, व तेथून थोड्याशा अंतरावर सुभेदाराचा वाडा आहे.