पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९३) आग्नेयीकडे जातो व दुसरा नैर्ऋतीकडे जातो. किल्ल्याचा दरवाजा उत्तर दिशेस आहे. हा दरवाजा अतिशय मजबूत असून त्याच्या संरक्षणाकरतां तेथें एक बुरूज बांधलेला आहे. या दरवाज्याच्या समोर कोनाड्यांत एक मारुतीची मूर्ति बसविलेली आहे. या दरवाज्यांतून सुमारे ८० यार्ड आंत गेलें म्हणजे दुसरा दरवाजा लागतो. याही दरवाज्याच्या रक्षणाकरतां एक मजबूत बुरूज व तटबंदी बांधलेली आहे. तेथून दक्षिणेच्या बाजूस थोडेसे पुढे गेलें ह्यणजे जेथे किल्ला रुंद होण्यास प्रारंभ होतो तेथे सोलाई व वाघाई या देवींचें एक देवालय आहे. या देवालयाचे काम फार नक्षीदार आहे. येथे दरवर्षी आसपासच्या एकंदर १४ गांवची फार मोठी जत्रा भरत असते. या देवालयाच्यापुढे डोंगराचे दोन फांटे झाले आहेत व त्या दोहीनांही तटबंदी केलेली आहे. आग्नेयीकडील फांट्यावर एक इमारत आहे. हिला छप्पर वगैरे काह नाही. ही पूर्वी कोठीची जागा होती असे सांगतात. या कोठीच्यापुढे काही अंतरावर पाण्याची लहान लहान टांकी आहेत. या टाक्यांच्या काठावर दगड बसविलेले आहेत, व त्यांवर काही लेख आहेत, परंतु हल्ली ते वाचतां येत नाहीत. या फांटयाची लांबी सुमारे ३०० यार्ड आहे, व जेथे त्याचा शेवट होतो तेथील तटबंदीचे काम फारच मजबूत आहे. या भागाला बालेकिल्ला असें म्हणतात. याची लांबी १८६ फूट व रुंदी १२६ फूट आहे. बालेकिल्लयांत दारुगोळ्याची कोठी व किल्लेदाराचा वाडा अशा दोन इमारती आहेत. हल्ली त्यांची पडापड झालेली आहे.