पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रांतील किल्ल्यांचे वर्णन. भाग दुसरा Nov ठाणे जिल्हा. हा जिल्हा उत्तरअक्षांश १८° ४२ आणि २००२०', व पूर्वरेखांश ७२° ४९' आणि ७३° ४८' यांच्यामध्ये आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३६७३ चौरस मैल आहे, व त्याची लोकसंख्या ८११४३३ आहे, आणि त्याचा वसूल सुमारे ११ लाख रुपये आहे. या जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग चिंचोळा होत गेलेला आहे, म्हणजे त्याच्या उत्तरसीमेची लांबी फक्त १३ मैल आहे. त्याच्या उत्तरेस काळू व दमणगंगा ह्या दोन नद्या असून त्यांच्या पलीकडे अमदाबाद जिल्ह्यापैकी सुरत प्रांत, व पोर्तुगीज लोकांच्या ताब्यांतील दमण प्रांत लागतो. पूर्वेस धरमपूरचे संस्थान, आणि नाशीक, अहमदनगर व पुणे हे जिल्हे आहेत. वर सांगितलेले तीन जिल्हे व ठाणे जिल्हा यांच्या दरम्यान सह्याद्रीची ओळ आहे. दक्षिणेस कुलाबा जिल्ह्यापैकी कर्जत व पनवेल हे तालुके व उरण, हागबेटें, मुंबई, साष्टीबेट हा प्रदेश आहे, व पश्चिमेस आरबी समुद्र आहे. या जिल्ह्याचे नऊ तालुके केलेले आहेत त्यांची नांवें येणेप्रमाणे:-१ डहाणू , २ माहीम, ३ वा., ४ वसई,