पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हणतात की, लो. टिळक यांनी इतके काम केले होते की त्यांनी विश्रांति घ्यावी, त्यांना बळजबरीनें विश्रांति घ्यावयास लावावें असें पुष्कळ डॉक्टरांचें त्यावेळीं मत होतें; कारण डॉक्टर म्हणत हे विश्रांति न घेतील तर थोडेच दिवसांत यांना हे जग सोडून जावें लागेल.. लो. टिळक मोकळे असते तर देशसेवेपुढे त्यांना विश्रांति घेण्याचं बिलकूल पटले नसतें व परिणाम भयंकर झाला असता; यासाठीं देवानें त्यांना ६ वर्षांची अशा तऱ्हेने विश्रांति घ्यावयास लावलें; त्यांचेकडून जगन्मान्य गीतारहस्य प्रगट करविलें, व मग त्यांना इकडे आणून उत्तम कामगिरी आणखी सहा वर्षे त्यांच्या हातून करून घेतली हे ईश्वराचे मोठे उपकार आहेत. असो, मंडालेस लिहिलेला 'गीतारहस्य ' हा दिव्य ग्रंथ बरोबर घेऊन, केंदेंतून सुटून बळवंतराव सन १९९४ साली पुण्यास आपल्या वाड्यांत सुखरूप आले. तेव्हां सर्व देश आनंदित झाला. एक गोष्ट मात्र वाईट झाली ती ही की, बळवंतराव तुरुंगांत गेले तेव्हां त्यांची गृहलक्ष्मी सहधर्मचारिणी सौ. सत्यभामाबाई घरीं होती, पण ते घरीं परत येण्यापूर्वीच ती अत्यंत सुशील पतिव्रता पतिविरहानें झरून झुरून हा लोक सोडून स्वर्गास निघून गेली होती. श्रीरामचंद्रा- प्रमाणें बळवंतरावांना लोकसेवा गृहसौख्यापेक्षा अधिक आदरणीय वाटत होती यामुळे मन घट्ट करून पत्नीच्या वियोगाचें दुःख मिळून त्यांनी देशसेवा करण्यास पुनः सुरवात केली. मागें सांगितलेच आहे की, बळवंतरावजी मतभेदामुळे आपल्या राष्ट्रीय पक्षासह काँग्रेसमधून बाहेर पडले किंवा काँग्रेसमधून त्यांना व त्यांचे पक्षाला बाहेर टाकण्यांत आले. पुढे लवकरच त्यांना मंडालेच्या तुरुंगांत जावें लागले यामुळे ते व राष्ट्रीय पक्ष ते परत येईपर्यंत बाहेरच ते होता. यामुळे काँग्रेस अतिशय रोडावली. यामुळे सुटून येतांच रोडाव- लेल्या राष्ट्रीय सभेला टॉनिक देऊन गुटगुटीत करण्याच्या उद्योगाला ते लागले. मोठ्या प्रयत्नांनी बळवंतरावांनी राष्ट्रीय सर्भेतील दोनही पक्षांचा समेट घडवून आणला. यामुळे राष्ट्रीय सभा पुनः गुटगुटीत झाली