पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व सन १९९६ पासून तर ती तेजानें व बळानें शुक्ल पक्षांतील चंद्राप्रमाणे वाढत चालली आहे. याशिवाय बळवंतरावांनीं दुसरे काम केले तें स्वराज्य संघस्थापनेचें. त्यांनी स्थापिलेला स्वराज्यसंघ आतां बाळसे- दार व गुटगुटीत झाला आहे व आपली कामगिरी जोरानें बजावीत आहे. चळवंतरावजींनीं यानंतर तिसरी कामगिरी केली ती ही कीं, राष्ट्रीय सभेचे शिष्टमंडळ घेऊन ते विलायतेस गेले. तेथे त्यांनीं ब्रिटिश लोकांच्या अनेक सभा भरविल्या व हिंदुस्तानाला काय पाहिजे हे त्यांनीं तेथील लोकांना समजावून सांगितले. त्याशिवाय पार्लमेंटाच्या कमेटी- समोर त्यांनी हिंदुस्तानला कशा प्रकारचें स्वराज्य पाहिजे हें स्पष्टपणे ठेविलें. या काम ते हिंदुस्तानचे स्टेट सेक्रेटरी माँटेग्यूसाहेब यांना- ही भेटले, व या प्रश्नाचा पुष्कळ वेळपर्यंत त्यांनी माँटेग्यू साहेबां- बरोबर खल केला. साठ वर्षे होऊन गेल्यावर व तुरुंगवासानें व म्हातार- पणानें अशक्तता आली असतां हा देशभक्त हजारों कोस प्रवास करून देशासाठी विलायतेंत गेला व तेथें शेंकडों मैल प्रवास करून त्यानें ब्रिटिश लोकांत हिंदुस्तानविषयीं जागृति उत्पन्न केली. हे पाहून हिंदी बांध- वांचे त्यांचेवरील प्रेम अतीशय बाढलें. बळवंतरावजी परत आल्यावर हजारों ठिकाणच्या लोकांनी त्यांचा गौरव केला व त्यांना मानपत्रें दिलीं व त्यांच्या मिरवणुकी काढल्या. बळवंतरावांवर देशबंधूचें प्रेम इतकें जडलें कीं, प्रभु रामचंद्र, श्रीकृष्ण यांचेप्रमाणे लोक त्यांची जयन्ती म्हणजे जन्मोत्सव करूं लागले. त्यांना साठ वर्षे पुरी झाली तेव्हां लोकांनीं त्यांचा अपूर्व सन्मान केला व त्यांच्या सार्वजनिक कामगिरीबद्दल त्यांना १ लक्ष रुपयांचा आहेर केला. तो सर्व पैसा स्वतःला न घेता . बळवंतरावांनी देशकार्याला दिला. बळवंतराव १९९९ च्या आगस्ट. महिन्यांत विलायतेहून हिंदुस्तानांत परत आले. त्यानंतर अमृतसरच्या राष्ट्रीयसभेला जाण्याची त्यांनी तयारी केली व मुंबई येथील प्रतिनिधींना घेऊन स्पेशल गाडीनें त्यांनी डिसेंबर महिन्याचे अखेरीस पंजाबकडे धांव घेतली. वाटेंत आपले परमपूज्य बादशहा पंचम जॉर्ज व