पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९३) करावी लागली यामुळे ही मोठी कामगिरी तशीच राहून गेली व कदा- चित् राजकीय कामगिरींत सर्व वेळ गुंतंन गेल्यामुळे ही पवित्र काम- गिरी शेवटपर्यंत तशीच राहिली असती. पण ईश्वराच्या मनांत हैं महत्कार्य त्यांचे हातून करून घ्यावयाचें होतें. राजकीय कामगिरी पुष्कळांना करतां येईल पण हे महत्कार्य करण्याला लो. टिळकांसारखा अद्वितीय मनुष्यच पाहिजे. म्हणूनच ईश्वरानें लो.टिळकांना मंडालेच्या तुरुंगांत एकांतवासांत पाठविले. गीतेसारख्या ग्रंथाचे मनन करावयास एकांत पाहिजे. तसा तो लोकमान्यांना मंडालेस मिळाला व त्यांच्या हातून हे महत्कार्य सिद्धीस गेले. 'श्रीमद्भगवद्गीतारहस्य ' हा ग्रंथ या देशांत इतका लोकप्रिय झाला आहे की त्याच्या हजारों प्रतींच्या आवृत्ति हां हां म्हणतां खपत आहेत. त्याची पहिली मराठी भाषेतील आवृत्ति फक्त तीनच महिन्यांत खलास झाली. या ग्रंथाचा लाभ सर्व हिंदी बांधवांना मिळावा म्हणून ह्याची हिंदी भाषेत लो. टिळकांनी आवृत्ति काढली तीही अशीच झदिशीं खलास झाली. पुढील हिंदी आवृत्तीवर अशाच उडया पहुं लागल्या. शिवाय याचीं गुजराथी, कानडी वगैरे भाषांत भाषांतरे होऊन त्या त्या भाषा जाणणारांना ह्या ग्रंथाचा लाभ मिळाला. ह्याची एक इंग्रजी आवृत्ति काढावी असे वळवंतरावांच्या मनांत होतें, पण वेळ न मिळाल्यामुळे तें तसेंच राहून गेलें. यावरून बाळांनों पहा की, लोकमान्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली याबद्दल देवाला आपण दोष दिला, ही गोष्ट वाईट झाली असे आपण मानलें, पण ही गोष्टी इतकी सुपरिणामी झाल्यावर प्रत्येकाच्या तोंडांतून हेच शब्द येतील कीं 'ईश्वरा तुझी लीला अगाध आहे. आम्ही अज्ञ मुलें आहा ! अज्ञानानें व उतावीळपणानें तुझ्या कृतीचें परिणाम आम्हाला दिसत नाहीत व आम्ही तुला दोष देतों. देवराया याबद्दल तूं आम्हाला क्षमा कर. यापुढें तूं जें जें करतोस ते ते आमच्या हिताचेंच असले पाहिजे असे आम्ही पक्के ध्यानांत ठेऊं. 'बाळांनो, जें जें घडून येतें तें सर्व शवेर्टी आपल्या हिताचेंच असणार असे पके ध्यानांत ठेवा. असेंही