पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९२ ) चाळपणापासून आवडतें व अत्यंत लोकोपयोगी अर्से तेजस्वी महत्कार्य स्वधर्मकार्य घडून आलें तें एवढे मोठें व महत्त्वाचे आहे की त्यांच्या आजपर्यंतच्या कामगिरीवरचा तो मुकुटच म्हणावयास हरकत नाहीं. तें महत्कार्य नुसतें देशकार्य नाहीं तें जगत्कार्य आहे. तें महत्कार्य म्हणजे ' भगवद्गीतारहस्या 'चं लेखन. भगवद्गीता हा ग्रंथ म्हणजे आपणा हिंदूंना अत्यंत पूज्य व अत्यंत वंद्य आहे. याचें महत्त्व सुप्रसिद्ध विदुषी योगिनी अॅनि बेझंट यांच्या परिश्रमानें युरोप व अमेरिका या खंडांतील लोकांना आतां स्पष्ट कळूं लागले आहे. लो. टिळक यांचें या ग्रंथाचे वाचन अगदी बाळपणी सुरू झाले. त्यांचे वडील आजारी असतां वडिलांच्या आज्ञेवरून बळवंतराव त्यांचे जवळ बसून भगवद्गीता वाचीत असत. तेव्हांपासून त्यांनी अनेक वेळां गीता वाचली, तिचा अर्थ लावला, तिच्यावरच्या सर्व टीका वाचल्या व निरनिराळ्या विद्वानांनी तिचे निरनिराळे अर्थ केले होते तेही त्यांनीं वाचिले. एकाच गीतेचे निरनिराळे अर्थ केलेले जेव्हां त्यांनी पाहिले तेव्हां त्यांना आश्चर्य वाटले. मग त्यांनी गीता नुसती मूळ मात्र वाचली. आपल्या मनानें टीका न पहातां त्यांनी गीतेचा सरळ अर्थ लावला. तेव्हां त्यांना स्पष्ट कळून आलें कीं, शंकराचार्य गीतेचा अर्थ करतात तसा तो नाहीं. गीता संन्यास घ्या म्हणून सांगत नाहीं, गीता आपापले काम निरपेक्ष बुद्धीने उत्तम करा असे सांगते. हें गीतेचें सांगणें, हा कृष्णाचा उपदेश स्वदेशाला इतकेच नव्हे तर सर्व जगाला सांगावा असे त्यांच्या मनांत फार होतें. कारण त्यांचे मत असे होते की, गीता ही केवळ हिंदुस्तानासाठी नाहीं ती सर्व जगाकरितां आहे. ती सर्व जगाचें कल्याण करण्या- करितां श्रीकृष्णांनी सांगितली आहे व ती सर्व जगांत प्रेम, ऐक्य, समता, बंधुभाव व शांति प्रस्थापित करण्यासाठी ईश्वरानें जगाला दिलेली देणगी आहे. ती प्रथम आपले हात पडल्यामुळे सर्व जगाला ती देणे हे आपलें मुख्य कर्तव्य आहे, असे लोकमान्यांचें मत होतें. हें कार्य त्यांना फार प्रिय होतें. पण वारंवार इतर कामगिरी