पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्यावा लागेल हे लो. टिळक नेहमीं मनांत बाळगीत असत म्हणूनच तुरुंगांतील वेळ देखील ते चांगले काम करण्यांत घालवीत. या त्यांच्या ● वेळाच्या सदुपयोगमुळेच एवढालीं प्रचंड कार्ये त्यांच्या हातून झाली. राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी व स्वराज्य यांबद्दलच्या त्यांच्या काम- गिरीचें थोडेंसें वर्णन वर आलेलेच आहे. राष्ट्रीय सभेत या विषयांबद्दल त्यांनी बरीच खटपट केली. पण त्या बाबतीत सन १९०७ सालीं राष्ट्रीय सर्भेत मतभेद झाला. राष्ट्रीय सभा मोडली व त्या सर्वेतील सभा- सदांत दोन पक्ष झाले. एक नेमस्त व दुसरा राष्ट्रीय. टिळक व त्यां चा राष्ट्रीय पक्ष हा १९०७ पासून १९९५ पर्यंत राष्ट्रीय सभे- बाहेर होता. सन १९०८ मध्ये टिळकांनी मुंबईतील गिरण्यांतील मजुरांचीं दारूनें झालेली बाईंट स्थिति पाहिली. त्यावरून आपल्या देशांतील बऱ्याच लोकांचें दारूच्या व्यसनानें जबरदस्त नुकसान होत आहे, ही गोष्ट त्यांच्या मनाला अतीशय दुःख देऊं लागली. लगेच त्यांनी त्या व्यसनावर जोराची स्वारी केली व तें व्यसन कमी होऊं लागले होतें. आणखी खटपट करा- वयास पाहिजे होती. पण इतक्यांत लो. टिळकांवर राजद्रोहाचा खटला झाला व त्यांना सहा वर्षे काळेपाण्याची शिक्षा न्यायमूर्ति दॉवर यांनी दिली. तथापि मुंबईच्या त्यावेळच्या गव्हर्नरांनी आपल्या अधि- कारांत ती शिक्षा जितकी सौम्य करितां आली तेवढी केली. म्हणजे त्यांनी सक्त मजुरीची शिक्षा होती ती बदलून नजरकैहेसारखी केली. लो. टिळक यांच्या जेवणाखाण्याची नीट व्यवस्था रहावी म्हणून दक्षिणी ब्राह्मण स्वयंपाकी स्पेशल त्यांचेसाठी पाठवून दिला. त्यांचा तुरुंगांतील बेळ फुकट जाऊं नये म्हणून त्यांचा पुस्तकसंग्रह त्यांचेकडे पाठवून दिला व त्यांना अंदमानास न पाठवितां मंडाले येथील किल्ल्यांत ठेविलें. या सर्व तजविर्जीमुळेच लोकमान्य पुनः परत आले व पुढे सहा वर्षे त्यांनी लोकसेवा केली. या चांगल्या व्यवस्थेचा दुसरा एक फायदा असा झाला कीं, लोकमान्यांचे हातून त्यांचे अगदी