पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याबद्दलंही आपले सरकार व लो. टिळक यांचें आतां एकमत झाले आहे. हिंदुस्तानाला स्वराज्य द्यावयाचें असें हिंदुस्तानचे स्टेट सेक्रेटरी माँटेग्यू साहेब व हिंदुस्तानचे व्हाइसरॉय यांचे पक्के मत झाले आहे. हिंदुस्तानाला पायरीपायरीनें स्वराज्य द्यावयाचे असा सन १९१७ सालींच मे. माँटेग्यू साहेबांनी ठराव पास करून घेतला आहे. इतकेच नव्हे तर त्या ठरावा- प्रमाणे रिफॅॉर्म अॅक्ट पास करून पार्लमेंटानें स्वराज्याचा पहिला हप्ता आपणाला देऊनही टाकला आहे. या काम लो. टिळकांचे परिश्रम व -खटपट सन १९०२ पासून चालू होती, तिचा फार उपयोग झाला व त्या त्यांच्या खटपटीचे गोड फळ सन १९९९ च्या डिसेंबर महिन्यांत पार्लमेंटसर्भेत स्वराज्याचा ठराव पास होऊन त्याला जॉर्ज बादशहा यांची संमति मिळाली हैं ऐकतांच लो. टिळकांना फार आनंद झाला व त्यांनी साम्राज्य सरकार व बादशहा यांचे लगेच कृतज्ञता- पूर्वक आभार मानले. अशा तऱ्हेनें सन १९०२मध्ये लो. टिळक यांनी हाती घेतलेल्या तीन गोष्टी म्हणजे स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या बन्याच फलद्रूप झाल्या व त्यासंबंधी सरकार व आपले देशबंधू यांचे एकमत झालें व विशेषतः आपली कार्ये सुपरिणामी व यशस्वी झाली हें पहाण्यास दैवाने लोकमान्यांना तितकें तरी आयुष्य दिलें हें फार चांगले झाले. लो. टिळक यांचे मनांत स्वदेशाविषय जितकें प्रेम वसत होतें तितकें किंवा त्याहूनही अधिक त्यांचे स्वधर्मावर प्रेम होते. पण एकच मनुष्य कोठें कोठें पुरा पडेल ? लो. टिळकांनी राष्ट्रीय समेत कामगिरी करावी, का राष्ट्रीय शिक्षणाची कामगिरी करावी, मद्यपान निषेधाची चळवळ करावी, का हिंदुलोकांचें प्रिय पुस्तक भगवद्गीता सोपे करून सर्वांना सांगावें का करावें तरी काय ? पण बाळांनों, वेळ मुळींच फुकट दवडावयाचा नाहीं. कारण वेळ ही ईश्व- राची अमोल देणगी आहे. शेवटीं दिलेली ही देणगी का आपणास म्हणजे आयुष्य आपण कसें खर्च केले याचा जबाब देवाजवळ