पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देशी वस्तूच विकत घ्याव्या असा त्यांनी कळकळीचा उपदेश केला व त्यामुळे बरेच लोक देशी वस्तू व देशी कापड वापरूं लागले. बळवंत- रावजी स्वतः देशीच कापड व देशी वस्तू वापरीत असत. नवीन नवीन देशी धंदे निघावे, जुन्या मोडकळीस आलेल्या उद्योगधंद्यांना चांगली स्थिति प्राप्त व्हावी म्हणून त्यांचे सारखे प्रयत्न चालू असत.. याच हेतून त्यांनी पैसाफंड हात घेऊन त्याला जोमांत आणून त्या पैसाफंडाच्या मदतीने तळेगांव येथें कांचकारखाना व कांचकाम शिक- विणारी शाळा काढली. या कामी त्यांनी पुष्कळ लोकांची मदत मिळविली. सरकारानेही या तळेगांवच्या कांचकामाच्या कारखान्याला आतां मदत चालू केली आहे इतकेंच नव्हे तर या कारखान्यांतील माल सरकारी कामाला विकत घेत जावा असा ठरावही केला आहे. पहिल्याने या कार खान्याविषयी सरकारचे मन साशंक होते पण पुढे त्यांचा संशय दूर झाला. लाकांना वैदेशिक्षणाबरोबरच राष्ट्रीय शिक्षण द्यावें असें बळवंतराव- जींना वाटत असे. ज्या शिक्षणानें स्वदेशाबद्दल, स्वधर्माबद्दल व स्वदे- शाच्या इतिहासाबद्दल प्रेम व अभिमान उत्पन्न होईल तें राष्ट्रीय शिक्षण. असलें राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी समर्थविद्यालय नांवाची शाळा कांचका- माच्या कारखान्यालगत पुष्कळ मित्रांना बरोबर घेऊन तळेगांव येथें बळवंतर/वजींनी काढली. तिच्याबद्दलही पहिल्याने सरकारचें मन साशंक होते, पण आनंदाची गोष्ट ही की, त्या समर्थविद्यालयाबद्दलही सरकारचें मन आतां साफ झाले आहे व त्या विद्यालयाला सरकारांनी मान्यता दर्शविली आहे. परस्परांविषयी संशय दूर होण्यास परस्परांच्या भेटी व संभाषणें उपयोगी पडतात तसेंच येथें झालें. सरकारी बड़े काम- दार तळेगांवास गेले व त्यांनी स्वतः या संस्था पाहिल्या तेव्हां त्यांचा संशय दूर झाला व त्यांचें व सरकारचें संस्थांविषयीं चांगले मत झालें. आमच्या देशाचा कारभार आमच्या हातांत असावा असें बळवंत- रावांना वाटत असे म्हणूनच स्वराज्याची चळवळ त्यांनी चालू केली.