पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८८) नेमले. बाबामहाराजांच्या बायकोचें नांव ताईमहाराज. बाबामहारा- जांच्या मार्गे त्यांचा वंश व नांव चालावे म्हणून ताईमहराजांच्या मांडीवर टिळकांनी एक लहान वयाचा जगन्नाथ नांवाचा मुलगा दत्तक दिला. पुढे या दत्तकप्रकरणांत बन्याच भानगडी व फिर्यादी- अर्यादी झाल्या. टिळकांना आपल्या अमोल वेळाची जवळ जवळ वीसवर्षे दगदग करावी लागली. बळवंतरावजींच्या मित्रांनीं जेव्हां हे प्रकरण अतिशय त्रासदायक होणार असें पाहिलं तेव्हां इतर कामांतील ट्रस्टी जसे राजिनामा देतात व मोकळे होतात तसे तुम्ही करा व या याता- यातीतून सुटा असें अगी विनवून सांगितले. पण ते म्हणाले, 'मी आपल्या मित्राचे कार्य सोडून देऊन त्याचा विश्वासघात करणार नाहीं." या मित्रकार्यासाठी मरणाच्या केवळ दहा दिवस आधीपर्यंत त्यांना एक- सारखें कष्ट करीत रहावें लागले. या कामांत त्यांच्या अंगच्या हुशारीने व चिकाटीने त्यांना शेवटीं यश आलें हें खरें, पण त्यामुळे त्यांचे हाल किती झाले ! ह्या प्रकरणांत हायकोर्टात अतीशय कुशलतेनें ज्या दिवशीं सक्त मेहनतीने त्यांनी जय मिळविला त्याच दिवशी रात्रीं जो त्यांना ताप भरला त्याच तापानें दहा दिवसांत त्यांना ओढून नेलें. म्हणजे मित्रासाठी त्यांनी देह झिजविला इतकेच नव्हे तर मित्रकार्योस देहाची आहुति दिली. बाळांनों, पाहिलात हा लोकोत्तर मित्र- प्रेमाचा मासला ! मित्र असावा तर असा असावा. बाळांनों असेच तुम्ही आपल्या मित्रांवर प्रेम करा, म्हणजे तुमचे मित्रही तुमच्यावर असेंच प्रेम करतील. आपल्या देशाचा भाग्योदय व्हावा, त्याचा नांवलौकिक वाढावा, त्याची भरभराट व्हावी, देशबंधूंना पोटभर अन्न व अंगभर जाडेभरडें तरी वस्त्र मिळावें याबद्दल रात्रंदिवस बळवंतरावांना तळमळ लागलेली असे. यासाठी लोकांनी स्वदेशी कापड वापरावें, स्वदेशी वस्तु परदेशी वस्तूपेक्षां जरी कमीप्रतीच्या असल्या तरी वापराव्या, त्यांना जरी जास्त किंमत पडली तरी ते पैसे आपल्या देशांतीलच मजुरांना व कामकरी मंडळीला मिळणार हैं लक्षांत ठेवून महाग असल्या तरी