पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८७) वेद व पारशीलोकांचे धर्मपुस्तक अवेस्ता या सर्वोच्या आधाराने सिद्ध केले आहे. हे पुस्तक त्यांच्या पहिल्या पुस्तकापेक्षांही जगांतील विद्वा- नांना अतीशय आवडलें. आपल्या सरकारनेही त्याची स्तुति केली, व त्यामुळे सर्व जगांतील थोर पंडितांत लोकमान्यांची गणना होऊं लागली. पाहिलेत बाळांनो, मनुष्याला इच्छा असली म्हणजे प्रत्यक्ष तुरुंगांतही असलें सुंदर पुस्तक लिहितां येतें. यावरून वेळ असतां व चांगली स्थिति असती तर मीं हैं केलें असते व तें केलें असतें या तुमच्या वल्गना फुकट आहेत. बाळांनो, यावरून कितीही अडचणी, संकटें आलीं तरी वेळांत वेळ काढून आपण चांगले काम करीत रहावे हा घडा तुम्ही शिका. वर सांगितलेलें सुंदर पुस्तक बळवंतरावांनी सन १९०१ मध्ये लिहिलें. लोकमान्य टिळकांच्या अंगांत निस्सीम देशभक्ति, स्वार्थत्याग, धैर्य व करारीपणा हे अतीशय मोलवान् गुण होते. यामुळेच त्यांचे देशबंधु ह्यांना त्यांच्याविषयी आदर वाटत असे. सरकारलाही हे त्यांचे गुण पाहून त्यांची किंमत कळून चुकली होती; पण सरकारला वाटे त्यांनीं आपल्या अंगांतील या उत्तम गुणांचा सरकारचे काम उपयोग करावा. बळवंतराव सरकारी नोकरींत शिरते तर या त्यांच्या गुणांनी ते अगदीं वरिष्ठ अम्मलदारीच्या जाग्यावर गेले असते व सरकाराने त्यांचा अतिशय सन्मान केला असता. वर सांगितलेल्या चार गुणांशिवाय मार्गे बापट प्रकरणांत सांगि- तल्याप्रमाणे मित्राकरितां वाटेल ते कष्ट सोसण्यास तयार व्हावयाचें, प्राणसंकटही सोसावयाचें याच गुणाचें उदाहरण त्यांनी बापटांना रात्रंदिवस जिवापाड मेहतन करून मदत केली हे होय. यापेक्षांही अधीक ढळढळीत उदाहरण म्हटलें म्हणजे ताईमहाराजांचें दत्तक प्रकरण होय. त्याची हकीगत अशी:- लो. टिळकांचे बाबामहाराज म्हणून एक जिवलग स्नेही होते. त्या बाबामहाराजांची मोठी जहागिरी व इस्टेट होती. त्यांनीं मरतांना टिळक व इतर काही मंडळींना बोलावून मृत्युपत्र केलें, व टिळक वगैरे ट्रस्टी त्या मृत्युपत्राप्रमाणे कारभार करण्यास