पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८६) विषयीं चांगलें मत देऊन सरकारचा गैरसमज दूर केला, तेव्हां सरकारने शिक्षा संपण्याच्या सहा महिने आधींच दयाळूपणाने बळवंतरावांना सोडून दिलें. थोर माणसें थोर माणसांच्या कशीं उपयोगी पडतात ते पहा; प्रख्यात पंडित मोक्षमुल्लर यांची व बळवंतरावांची ओळख व मैत्रि कशी जमली ती सांगतोंः-- ओरायन. बाळांनों, ओरायन या नांवाचें पुस्तक बळवंतरावांनी लिहिलें. त्यांनी सन १८९२ सालीं लंडन शहरांत प्राचीन शास्त्रज्ञांच्या परिषदेकडे पाठविलें व नंतर १८९३ साली छापून जगांतील अतिशय विद्वान् प्राचीन शास्त्रांचा शोध करणान्या पंडितांकडे पाठविलें. या पुस्तकांत आपले वेद ग्रंथ इ. सनापूर्वी सुमारे ५००० वर्षांपूर्वी लिहिले असले पाहिजेत अर्से ज्योतिषशास्त्र व वेदांतांतील वचनें यांवरून सिद्ध करून दाखविलें होतें. पुस्तकाची एक प्रत थोर पंडित मोक्षमुल्लर यांचे- कडेही बळवंतरावांनी पाठविली होती. ती वाचून टिळक हे अतीशय विद्वान्, शोधक व तीक्ष्ण बुद्धीचे आहेत अशी प्रो. मोक्षमुल्लर यांची खात्री झाली. त्या पुस्तकांतील विषयासंबंधानें टिळकांचा व प्रो. मोक्षमुल्लरांचा बराच पत्रव्यवहार झाला व त्यावरून या निरनिराळ्या देशांत रहाणाच्या पंडितांची मैत्री जुळली. हे पुस्तक सर्व जगांतील विद्वानांना अतिशय आवडलें व त्या वर्षांतील पुस्तकांत त्याला पहिला नंबर मिळाला. सन १८९७-९८ मध्ये बळवंतरावांना बारा महिने तुरुंगवा- सांत काढावे लागले. तुरुंगांत सक्त मजुरीची शिक्षा होती तरी रात्रीच्या वेळीं सरकारनें मेहेरबानी करून त्यांना वाचनाची सोय करून दिली होती. त्या सोईचा फायदा घेऊन तेथेंही योग्याप्रमाणे शांत मन ठेवून त्यांनी आपला सर्व जगांताल पंडितांना थक्क करून सोडणारा एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचें नांव 'आर्टिक होम इन दि वेदाज' म्हणजे 'आयांचें उत्तरध्रुवाकडील मूलस्थान.' या ग्रंथांत लो. टिळकांनी आपले आर्यपूर्वज आरंभी उत्तरध्रुवाजवळ रहात होते व त्यांनी चेद लिहिले असें ज्योतिषशास्त्र, भूगर्भशास्त्र व दुसरी अनेक शास्त्रें व