पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भजन व गुणगायन एके ठिकाण जमून करावें म्हणून बळवंतरावांनी सन १८९४ पासून गणपतीचे सार्वजनिक उत्सव सुरू केले. त्यामुळे दर वर्षी धर्मावर गांवोगांव शेंकडों विद्वानांची व्याख्यानें हजारों लोकांना ऐकावयास मिळू लागली आहेत व भक्तिमार्गाकडे लोकांचें बरेंच लक्ष्य लागले आहे. ज्याप्रमाणे देवाविषयीं पूज्य बुद्धेि वाढविण्यासाठी बळवंत- रावांनीं गणपतिउत्सव सुरू केले त्याचप्रमाणे थोर ऐतिहासिक पूर्वजां- विषयीं पूज्यबुद्धि वाढावी व ऐतिहासिक ज्ञानांत भर पडावी म्हणून त्यांनी शिवाजीउत्सव सुरू केले. हेही उत्सव हिंदुस्तानांत व हिंदुस्ताना- बाहेर आफ्रिका, अमेरिका खंडांत देखील गणपीतउत्सवाप्रमाणेंच दरवर्षी मराठी लोक मोठेचा प्रेमानें साजरा करतात. बळवंतरावांचेवर आपल्या या महाराष्ट्राचें त्यांच्या वर सांगि- तलेल्या अनेक सार्वजनिक हिताच्या कामांवरून व त्यांचा अलौकिक स्वार्थत्याग, धैर्य, देशभक्ति व करारीपणा वगैरे गुणांवरून अतीशय प्रेम जडलें व त्यांनी बळवंतरावजींना आपल्या वतीने सन १८९५ सालीं एकदां व सन १८९७ साली पुनः मुंबईसरकारच्या कायदे कौन्सिलाचे सभासद निवडलें. अशा त-हेनें सर्व सुरळीत चाललें होतें, इतक्यांत देशाच्या दुर्दैवानें सन १८९६ सालीं प्लेगची सांथ या देशांत सुरू झाली. तिनें मुंबईस व पुण्यास कहर उसळला. हजारों माणसे पटापट मरूं लागली. लोक भीतीनें अगीं गांगरून गेले. त्या भयंकर प्रसंगी बळवंतरावांनीं जिवाकडे न पाहतां सरकारला व लोकांना अतिशय मदत केली. प्लेगचे रोग्यांसाठी हॉस्पिटल काढलें. व तेथें प्लेगचे रोगी नेण्याची सरकारांनी व्यवस्था केली. ती कोमल मनाच्या हिंदी लोकांना नापसंत झाली व त्यामुळे दोन बड्या अधिकाऱ्यांचे खून झाले. या बाबतींत संशय व गैरसमज उत्पन्न होऊन सरकारनें बळवंतरावांवर राजद्रोहाचा खटला केला व बळवंतरावांना १८ महिन्यांची शिक्षा झाली. पुढे मॅक्समुल्लर वगैरे विलायतेंतील विद्वानांनी बळवंतरावां-