पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८४) च्या सभा भरवण्यास योग्य असे विस्तीर्ण पटांगण, पाण्याने भरलेले तुडुंच हौद सर्व कांहीं आतां या बाड्याच्या आवारांत आहे. बळवंतरावजींनी नुसत वर्तमानपत्रे चालविण्यांतच आपला सर्व वेळ खर्च केला अर्से नाहीं. वर्तमानपत्रे चालविणे हे काम त्यांच्या अनेक देशकार्यापैकी एक होतें. देशाच्या हितासंबंधी जे जे काम त्यांच्या नजरेस पड़े तें तें ते अत्यंत कळकळीनें बजावीत असत. राष्ट्रीय सभेला ते नेहमीं जात असत व राष्ट्रीय सभेसंबंधी अनेक कार्मे ते मोठ्या हौसेनें करीत असत. जसे बळवंतरावांचें देशावर विलक्षण प्रेम होतें तसेंच त्यांचे स्वतःच्या मित्रांवरही अतिशय प्रेम असे. याची प्रचीति सन १८९४ मध्ये कळून आली. त्यांचे एक स्नेही रा. बापट यांचेवर बडोदे येथें एक भयंकर खटला चालू झाला. त्या प्रसंगी केवळ मैत्रीखातर बळवंत- राव बडोद्यास गेले. तेथें रात्रंदिवस अत्यंत मेहनत घेऊन त्यांनीं बाप- टांच्या बचावाची उत्तम तयारी केली व ना. दाजीसाहेब खरे यां च्या मदतीनें बापटांचा खटला जिंकून त्यांना दोषमुक्त ठरवून घेतलें. मित्र असावा तर असा असावा, नाहींतर भोजनभाऊ मित्र वाटेल तेवढे मिळतील. बाळांनों, मार्गे न्या. रानडे यांचे चरित्र तुम्हाला सांगत अस- तांना मीं तुझांला सांगितलेच कीं, भागवतधर्म न्या. रानडे यांना फार आवडत असे. भक्तिमार्ग विद्वान्, अडाणी पुरुष, बायका-मुले या सर्वांना फारच सोपा व देवाचें प्रेम मनांत ठसविण्यास अतिशय उपयोगी असें न्या. रानडे यांना वाटत असे. आणि म्हणून ईश्वराची भक्ति करण्या- करितां, त्याची अनन्यभावें प्रार्थना करण्याकरितां सर्व लोकांना ज्यांत एकत्र हातां येईल अशा प्रार्थनासमाजांना न्या. रानडे यांचा पाठिंबा असे. त्याचप्रमाणें घरोघर देवपूजा अथवा देवभक्ति होत असली तरी लोकांत धर्माबद्दल प्रेम, धर्माची जागृति, धर्माचे ज्ञान व भक्तिमागीची आवड उत्पन्न करण्याकरितां व सर्व समाजानें एकत्र जमून वर्षांतून निदान दहा दिवस तरी धर्माचे विवेचन, धर्माच चिंतन, देवाचें पूजन, देवाचें