पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४)

हरकामी घेत असत अशा न्यायमूर्ति माधवराव गोविंद रानडे यांचे चरित्र मी आपणाला प्रथम सांगणार आहे. ते सर्वांत वयानें वडील व ज्ञानानेंही तसेच होते. त्यांनी लो० टिळक, प्रिन्सिपाल आगरकर, वगैरेनां आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे योग्य सल्लामसलत अतिशय प्रेमानें दिली. आपलें काम बाजूला ठेवून ते मोठ्या प्रेमानें त्यांचें स्वागत करीत. प्रेमानें शांतपणे त्यांचें म्हणणे ऐकून घेत व त्यांना पाहिजे असेल त्यासंबंधीं परिणामी हितकर असा त्यांना सल्ला देत असत व त्यांच्या कामांत नेहमीं त्यांना मनापासून उत्तेजन देत असत. त्यांचें कोठें चुकत असेल तर ते त्यांना कसें चुकत आहे ते समजावून सांगत व त्यांना योग्य मार्ग दाखवीत. अशा तऱ्हेनें त्यांचेंच नांव पुढे करून व आपले नांव बिलकूल पुढें न येऊं देतां मोठमोठ्या संस्था त्यांचे नांवावर ते चालवीत. तसेच दुसऱ्या अशाच थोर गृहस्थांना त्यांच्या त्यांच्या धंद्यांत योग्य उपदेश करीत. तोच धंदा स्वतःच्या फायद्याचा कसा करावा हे सांगत. आपल्या धंद्यापासून देशाचें हित कसें साधावें है त्यांना गोडीगुलाचीनें, खुबीनें समजावून सांगावें असा त्यांचा नित्यक्रम असे. त्यांचा हतु हा, की आपण दशहित करावें व इतरांकडूनही देशहित करवून घ्यावे. अशा थोर संततुल्य माधवरावजी रानडे यांचे चरित्र सांगितल्यावर मी महातेजस्वी व स्वदेशाभिमानी विष्णुशास्त्री चिपळुणकर यांचें चरित्र सांगणार आहे. आपली मायभाषा मराठी हिला हल्लीचें उत्तन स्वरूप देण्यासाठी त्यांनी कसे जिवापाड परिश्रम केले, हे मी सांगणार आहे. मुलांना शिक्षण उत्तम मिळावें व थोडक्या खर्चीत मिळावे म्हणून आपल्या पोटास चिमटा देऊन त्यांनी कशी योजना केली व त्या योजनेला हल्लीं सुंदर व भव्य स्वरूप कसें आलें आहे हे आपणांला दाखविणार आहे. त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचें चरित्र मी तुम्हांला सांगणार आहे. त्यांचेविषयीं मी काय काय सांगणार आहे हे सांगण्याची जरूर नाहीं असेंचना म्हणतां? बरोबर आहे तुमचें म्हणणे, कारण ते तुम्ही समज- लांच असाल. त्यानंतर लोकमान्यांचे प्रेमळ सहकारी मित्र व बंधु ज्यांचें