पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५)

स्मरण झाले म्हणजे लोकमान्यांचे डोळे पाण्याने भरून येत असत अशा थोर प्रिं. गोपाळ गणेश आगरकरांचें चरित्र मीं तुम्हांला सांगणार आहे. अंगांत घालायला फक्त एकच एक सदरा व रात्रीं वाचायला म्युनिसिपालिटीचा रस्त्यावरचा कंदील असले ज्याचें दारिग्र असा गरीब पोरका मुलगा केवळ स्वतःच्या बुद्धिबळावर व परिश्रमावर अत्यंत विद्वान् कसा होतो, अत्यंत विद्वान झाल्यावर कर्धीही न दिसलेली संपत्ति पायावर लोळत येत असतां केवळ लोकसेवेसाठी मोहाला दूर करून व त्या संपत्तीला लाथ मारून मरे- पर्यंत कशी देशसेवा करीत रहातो, हे बाळांनों, प्रि० आगरकरांच्या चरित्रांत तुम्हांला दिसून येईल. यानंतर मी तुम्हांला भारतसेवक गोपाळ कृष्ण गोखले यांचे चरित्र सांगणार आहे. दैवानें गरिबीत जन्माला घातलें, बुद्धि देखील साधारण दिली, तरी देखील मनुष्य केवळ आपल्या स्वतःच्या मेहनतीनें डोंगराच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत कसा भरा. भर चढत जातो, स्वजनांकडून कसें 'धन्य धन्य' म्हणवून घेतो, चिपळुण- कर, टिळक व आगरकर यांचा भक्त बनून स्वार्थावर कशी लाथ मारतो, निस्सीम देशप्रेम व कर्तव्यनिष्ठा यांनी स्वदेशांत व सर्व जगांत कसा वंदनीय होतो व शेवटीं राजापासून रंकापर्यंत सर्वांचें प्रेम संपादन करून एकदम देह टाकून लोकहृदयांत कसा प्रवेश करतो, हें नामदार गोखल्यांच्या चरित्रांत बाळांनों, तुझांला पहावयास सांपडेल. असली ही मनोहर सुबोध कथा चित्त देऊन ऐका व त्यावरून चांगला बोध घेऊन आपले मन व वर्तन पवित्र बनवा अशी आपली सर्वांची विनंति करून हें लांबलेले हितगुज आतां पुरे करितों.

न्यायमूर्ति माधव गोविंद रानडे.
'दया क्षमा शांति तेथें देवाची वसति'
तुका म्हणे तोचि संत सोशी जगाचे आघात '--तुकाराम


 बाळांनों, विठोबारायाचे थोर भक्त तुकाराम महाराज यांचे अभं- गांचे दोन चरण वर दिले आहेत, त्यांत कितीतरी उत्तम तत्त्व अगदीं