पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३)

रहावयास आला आहे. लोक म्हणतात तो मेला. मी म्हणतों ' नाहीं. तो अमर झाला, तो चिरंजीव झाला. त्यानें मरणालाच मारून टाकले.' बाळांनो, तुम्हांला कसे वाटतें ? शाबास ! माझ्याचप्रमाणे तुम्हांला वाटतें हैं ऐकून माझ्या मनाला फारच आनंद होत आहे. खरोखरच हे थोर पांच पुरुष अमर झालेले आहेत. ते आपोआपच अमर झाले नाहीत. त्यांनी आपले शरीर स्वदेशसेवेंत झिजविले आहे. त्यांनी आपले शरीर परोपकारासाठी कष्टविलें आहे. त्यांनी स्वतःचें सुख व चैन टाकून देऊन दुसऱ्यांचें दुःख दूर केले आहे. त्यांनी दुर्जनांना सज्जन करण्या- साठी फार मेहनत घेतली आहे. त्यांनी ज्ञान संपादन करून ते ज्ञान हजारों लोकांना दिलेले आहे. त्यांनी देशाची स्थिति सुधारली आहे. त्यांनी आपल्या समाजाला सुधारण्याचा कसून प्रयत्न केला आहे. त्यांनी मुलांना, मुलींना व थोरांना शिक्षण देण्यासाठी शाळा, कॉलेजें, छापखाने, वर्तमानपत्रे व मासिकें काढली आहेत. लोकांनी देवाला स्मरावें, भक्तिवान् व्हावें म्हणून मंदिरें तयार करून ठेविली आहेत. त्यांनी आपली मायमाषा जोरदार व तेजस्वी बनविली आहे. त्यांनीं आपल्या भाषेला सुंदर बनविली आहे. लोकांचे मनोरंजन व्हावे म्हणून त्यांनीं सुंदर सुंदर चित्रे, रामलक्ष्मणांसारख्या थोर पुरुषांची चित्रे, शिवाजी महाराज, अकबर यांसारख्या थोर राज्यकर्त्यांची चित्रें, त्याच- प्रमाणे अतिशय दूर राहणाऱ्या आपल्या हल्लींच्या प्रिय पंचम जॉर्ज बादशहांची चित्रे, त्याचप्रमाणे थोर दयाळू महाराणी व्हिक्टोरिया व एडवर्ड बादशहा यांची चित्रे आपणांला स्वस्त मिळावीं अशीही त्यांनीं तजवीज केलेली आहे. असे त्यांनी आपल्यावर अनंत उपकार केलेले आहेत. त्यांनी आपल्या सेवेस नेहमीं तत्पर असा भारतसेवक- समाज तयार करून ठेवला आहे. बाळांनों, त्यांच्या उपकारांचें वर्णन करावें तेवढे थोडेंच. यासाठी विशेष सांगत न बसतां मी एवढेंच म्हणतों, की त्यांनी आपल्या थोर कृत्यांनीं आपलें मन काबीज केले आहे. अशा त्या थोर पुरुषांपैकी सर्वोस पूज्य असलेले व सर्व ज्यांची सल्लामसलत