पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८३ ) अशी बिचाऱ्याची स्थिति होते. यामुळे शरीर पिळदार व निरोगी कर- ण्यास बिचाऱ्याला पोटभर अन्न व विश्रांतिच मिळत नाहीं. शिवाय अज्ञानामुळे दारू वगैरे वाईट व्यसनें त्याला जडतात, यामुळे पुस्तकी पंडिताप्रमाणेच हे हातोडीबहाद्दर तरुणपणींच मृत्यूचे दरबारांत जा- तात. बाळांनों, याला उपाय एकच; तो हा कीं, पुस्तकी पंडितांनीं आपला फावला वेळ घिसाडी कामगिरी मजेनें व हौसेनें करण्यांत घालवावा व हातोडीबहाद्दरांनी आपला फावला वेळ विद्या शिकण्यांत घालवावा.. म्हणजे दोघेही निरोगी, सशक्त व दीर्घायु होतील व हल्लींप्रमाणें परस्प रांचा तिरस्कार करण्याऐवजी परस्परांवर आदरपूर्वक प्रेम करतील. अस झाले म्हणजे हा आपला देश अतिशय सुखी व श्रीमंत होईल. यासाठीं बाळांनों सांगायची गोष्ट ही कीं, ज्याप्रमाणे विलायतेतले ग्लॅडस्टनसारखे थोर लोक मजेखातर घरची सरपणाच लांकडें फोडतात किंवा ज्याप्रमाणें थोर अमेरिकन पंडित प्रसंगी घरचें गवंडीपणाचें व सुताराचें काम करितात, त्याप्रमाणे किंवा ज्याप्रमाणे जरूर पडतांच लोकमान्य पंडित बळवंतराव उत्तम यांत्रिक घिसाडी बनले त्याप्रमाणे तुम्ही व्हा, म्हणजे तुझांला एकांगीपणाचा दोष लागणार नाहीं व गरीबीची मीठ भाकर पंचपकान्ना- पेक्षां गोड लागेल. हळूहळू बळवंतरावांनी आपल्या प्रिय 'केसरी' पत्रासाठी नवीन छापखाना आणला. आपल्याला व त्या पत्राला एके ठिकाणीं रहातां यावें म्हणून एक मोठा थोरला वाडा विकत घेतला. त्या वाड्याचें नांव ' गाय- कवाडाचा वाडा. ' हा वाढा त्यांनी श्रीमंत सर सयाजीराव महाराज गायकवाड यांचेपासून सुमारे पंधरा हजार रुपयांस विकत घेतला. या वाड्यांत त्यांना पाहिजे होत्या त्या सर्व सोयी त्यांना करतां आल्या. या वाड्यांत स्वतःला रहाण्यास सोईचें घर, छापखान्यासाठी इमारती, केसरी व मराठा पत्रांचे ऑफिसासाठी व अत्यंत दुर्मिळ व मौलवान् व उपयुक्त अशा हजारों पुस्तकांच्या लायब्ररीसाठी मोठाली दालनें, हजारों लोक:-