पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्यवस्था ठेविली कीं, लवकरच त्या पत्रांवर असलेले मोठे कर्ज त्यांनी फेडून टाकलें. नंतर केसरी व मराठा ही पत्र अतीशय खपूं लागली.. विशेषतः केसरीच्या हजारों प्रती एक दिवसांत काढणे या देशांतील सांध्या यंत्रांना अशक्य झाले, म्हणून बळवंतरावांनी अतिशय जबरदस्त साम- र्थ्याचें असें एक नवीनच छापण्याचे यंत्र विलायतेहून आणले. व तें एंजिनाच्या जोरावर चालविण्याची व्यवस्था केली. असे म्हणतात की, पुस्तकी पंडितांना यांत्रिक घिसाडी काम साधावयाचें नाहीं व यांत्रिक घिसाड्यांना पुस्तकी पांडित्य करतां यावयाचं नाहीं, पण हे म्हणणे बळ वंतरावांना बिलकूल लागू नाही. जसे ते पुस्तकी पंडित होते तसे जरूर पडतांच ते उत्तम यांत्रिक घिसाडी बनले. स्वतःचे नवीन छापखान्याचें यंत्र आले तेव्हां बळवंतराव त्याचे आलेले भाग येथे कसे जोडावे व तें यंत्र येथें कसें उभारावें हे पुस्तकाबरून स्वतः शिकले व एवढ़ें अज यंत्र त्यांनीं स्वतः जोडून स्वतः उभारले व स्वतः चालू केलें. पुढे कधीं तें नादुरुस्त झाल्यास किंवा बंद पडल्यास स्वतः चालू करून देत असन अर्से सांगतात. बाळांनो, ह्यावरून तुझांला पुष्कळ शिकतां येण्या- सारखे आहे. आपल्या इकडे विद्वान् पंडितांना घिसाडी काम करणे म्हणजे लाजिरवाणी गोष्ट वाटते व शिवाय कॉलेजमध्यें नुसती पुस्तकें घोकून व व्यायाम सोडून त्यांनी आपले शरीर दुबळें करून टाकलेलें असतें. यामुळे त्यांचा मेंदू सशक्त व शरीर दुबळें अशी स्थिति होते, त्यांना अन्न पचेनासें होत. त्यांचें शरीर रोगाचें क्रीडामंदीर व डॉक्टरांची प्रयोगशाळा बनते व लवकरच त्यांना तरुणपणांतच मरावें लागतें. अशीच स्थिति आपल्या इकडच्या घिसाड्यांची होते. विचारा हातोडीबहाद्दर असतो, पण अक्षरशत्रु असल्यामुळे आपल्या यांत्रिक घिसाडी कामांत इतर देशांत कसकशा सुधारणा होत आहेत हे त्याला वाचायला सांपडत नाहीं. यामुळे आपल्या धंद्यांत विलायती सुधारणा आणून विलायतच्या हातोडीबहाद्दरांप्रमाणे त्याला गच्चर होतां येत नाहीं. मरमर मरावें व पोटास ओली कोरडी भाकर मिळवावी