पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लिहिले आहे की 'केसरीपत्र' व 'मराठा पत्र' काढण्यापूर्वी बळवंतराव टिळक व गोपाळराव आगरकर हे न्या. माधवराव रानडे यांचे घरीं गेले, त्यांना कसें करावें म्हणून नम्रपणाने विचारलें व न्या. रानडे यांनीं अतीशय प्रेमानें व कळकळीने त्यांना उत्तेजन दिले व बराच वेळ बसून चांगली सल्ला दिली. नंतर बळवंतराव व त्यांचे मित्र यांनी केसरी व मराठा वर्तमानपत्रे सुरू केलीं. एकदां कांहीं काम न्या. माधवराव रानडे यांस भेटून करून घ्यावे म्हणन बळवंतराव मुद्दाम पुण्याहून मुंबईस न्यायमूर्ति यांच्या बंगल्यावर गेले. टिळकांस पहातांच न्याय- मूर्तीना फार आनंद झाला व लगेच त्यांनी त्यांचे काम केले व मग चहाचे वेळी म्हणाले 'नुसती चिठी पाठवून काम झाले असते त्याला इतकी येण्याची दगदग कशाला घेतली ?' असो; तर बाळांनो सांगावयाची गोष्ट ही कीं थोर माणसांनी एकमेकांवर जरी कितीही कडक टीका केली तरी त्यांचे एकमेकांवर अतीशय प्रेम असते. न्या. माधवराव रानडे, डॉ. सर रामकृष्ण भांडारकर, बळवंतराव टिळक, गोपाळ- व आगरकर व नामदार गोखले यांचे एकमेकांवर अतीशय प्रेम होते व एककमेकांविषय त्यांच्या मनांत आदर बसत असे. बळवंतरावांना वर्तमानपत्रांपासून मदत होत नसे म्हणन संसार- खर्चासाठी त्यानी लॉक्लास काढला है वर सांगितलेंच आहे. त्याशिवाय मोगलाईत लातूर येकापूसथें पिंजण्याची त्यांनी एक गिरणी काढली होती; ती गिरणी फारशी फायदेशीर झाली नाही व पुर्डे पुण्यास प्लेग सुरू झाल्यामुळे लॉक्लास बंद झाला. नंतर घरप्रपंचाचा खर्च भागविण्याचें ही वर्तमानपत्रे हेच एक साधन झाल्यामुळे त्याकडे अधिक लक्ष्य देऊन त्याची सर्व व्यवस्था बळवंतरावांनी आपल्या देखरेखीखाली आपले भाचे रा. धोंडोपंत विद्वांस यांचे मार्फत सुरू केली. जसे बळवंतरावजी उत्तम पंडीत, उत्तम लेखक, उत्तम मुत्सद्दी व उत्तम पुढारी होते तसेच उत्तम त-हेचे व्यवहारचतुरही होते. यामुळे आपले रहाते घरीं केसरी व मराठा या वर्तमानपत्रांची कचेरी आणून त्या पत्रांची त्यांनी इतकी चोख ६