पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८०) नाहीं. स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी १८९० साली एक लॉक्लास चालू केला. या लॉक्लासांत कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी शिकत असत व वकीलीच्या परीक्षेला बसत असत. बळवंतरावांची शिक विण्याची पद्धत फारच चांगली होती. वरवर कसा तरी विषय शिकवावा व वेळ मारून न्यावी असें त्यांचें कधींच नव्हतें. कोणचाही विषय शिकवूं लागले म्हणजे त्या विषयांत ते अगदीं तल्लीन होऊन जात असत. खऱ्या शिक्षकाचें असेंच असतें. कर्धी एकदां घंटा होईल व कधीं आपण चालते होऊं असें त्यांच मुळींच नसतें. उलट एवढ्यांत कशी घंटा झाली व एवढ्यांत कसा तास संपला याचेंच त्यांना आश्चर्य वाटे. बळवंतरावांच्या लॉक्लासाविषयीं एक मजेदार हकीगत ऐकली आहे ती येथें देतों. न्यायमूर्ति माधवराव गोविंद रानडे हे फार थोर पुरुष त्या वेळीं पुण्यास होते. टिळकांचा नवीनच लॉक्लास निघाला होता. नवीन सर्व संस्था पहाव्या, त्यांतील गुणांचे गौरव करावें, असा न्या. माधवरावांचा रिवाज असे. त्याप्रमाणे एके दिवशी सकाळी न्या. माधवराव अगदीं संथपणे बळवंतरावांच्या लाक्लासांत आले व अगदर्दी मागच्या बांकावर बसले. बळवंतराव शिकविण्यांत तल्लीन झाले होते. व विद्यार्थी शिकण्यांत गुंग झाले होते. यामुळे एवढा थोर पुरुष आल्याचें कोणाच्याच लक्षांत आलें नाहीं. माधवरावजीही शांतपणें तास सरेपर्यंत बसले. तास सरल्यावर माधवरावांनी टिळकांना कांहीं प्रश्न केले. टिळकांनीं प्रश्नांचीं खुलासेवार व समाधानकारक उत्तरें दिली, त्यामुळे, माधवराव खूष झाले, व त्यांनीं टिळकांची पाठ थोपटली. बाळांनों, पुष्कळ लोकांना असे वाटे व अजूनही वाटतें कीं न्या. माधवराव व बळवंतराव टिळक यांचें वांकडें होतें, पण तें अग खोटे आहे. बळवंतराव टिळकांविषयीं माधवरावांच्या मनांत फार प्रेम होतें व बळवंतरावांचे मनांतही माधवरावांविषयीं फार आदर वसत होता. नुक तांच बळवंतराव टिळकांच्या गुणांचे वर्णनपर, एक लेख न्या. डॉ. सर नारायणराव चंदावरकर यांनी लिहिला आहे, त्यांत त्यांनी असे त्या