पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७९) सुरू करण्यांत आलें. मग सर्व व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून या मंडळीनें आपली सोसायटी बनविली तिला डेक्कन एज्युकेशन सोसायटी अर्से नांव दिल. तिच्यांत या मंडळीशिवाय आणखी दुसरी सन्माननीय मंडळी घेण्यात आली. असें सर्व नीट चालले होते. परंतु सन १८९० सालीं बळवंतराव व सोसायटीतील इतर सभासद यांच्यांत कांहीं बाबतींत मतभेद झाला. यामुळे या मंडळींतून बळवंतरावांनी आपले अंग काढून घेतलें.. त्याचप्रमाणे सन १८८८ सालीं बळवंतराव व गोपाळराव आगरकर यांच्यांत मतभेद होऊन गोपाळरावांनीं केसरीशी असलेला आपला संबंध तोंडून टाकला. यानंतर केसरी व मराठा ही बळवंतरावांच्या एकट्याच्या मालकीचीं झाली. त्यावेळीं त्या पत्रांवर ७००० रुपये कर्ज होते. ते बळवंतरावांनीं नीट व्यवस्था ठेवून पुढे दहा वर्षांत फेडून टाकलें. एवढे मोठें कर्ज त्या वर्तमानपत्रांवर असतां हीं पत्र बळवंतरावांनीं आपल्या ताब्यांत घेतलीं व एवढें जड ओझें आपल्या डोक्यावर आपण होऊन लादून घेतलें तें काय म्हणून' असे बाळांनों, तुझी सहज विचाराल.. त्याचें खरें कारण हें कीं, वर्तमानपत्र हें लोकांना चांगले विचार शिक- विण्याचें एक साधन आहे हे बळवंतरावांना पक्के माहीत होतें. आपल्या देशबंधूंना आपले विचार कळवावे, त्यांच्या मनांत प्रबळ देशप्रेम उत्पन्न करावें, त्यांना देशसेवा करण्यास उत्सुक करावें, त्यांना जगांत काय चाललें आहे तें सांगून शहाणे करावें, त्यांना युरोपिअन लोकांनी ज्या नवीन नवीन अचाट गोष्टी केलेल्या आहेत त्यांची माहिती द्यावी, इतर देश भराभर पुढे जात आहेत तसा आपला देशही पुढे गेला पाहिजे अ लोकांच्या मनांत ठसवायें, असें बळवंतरावांना फार वाटत असे. आणि म्हणूनच या कामीं केसरी व मराठा या वर्तमानपत्रांचा फार उपयोग होईल असे वाटून त्यांनी ही जबाबदारीची कामगिरी आपल्या डोक्यावर घेतली. बाकी आपलें पोट भरावें व चैन चालावी या हेतूने त्यांनी हीं वर्तमानपत्रे आपले हातांत घेतली नाहीत व पहिल्या दहा वर्षांत तरी त्यांना या वर्तमानपत्रापासून स्वतःच्या प्रपंचाला मुळींच मदत झाली