पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७७) धर्म आहे तसा किंवा त्याहीपेक्षा अधिक पवित्र व महत्वाचा धर्म व कर्तव्यकर्म व्यायाम करणे, पोहणें, निरनिराळे खेळ खेळणें, तालीम करणें व शरीर कमावर्णे हा आहे. यासाठी रोज तालिम करीत जाव निरानेराळे शरीर पिळदार बनवणारे खेळही खेळत जा.' हा वडि- लांचा उपदेश बळवंतरावांना पटला व त्या उपदेशाप्रमाणे बळवंत-

  • रावांनी कॉलेजमध्ये आपला बराच वेळ पोहणे, इतर मर्दानी खेळ

खेळणें व तालीम करणें, यांत खर्च केला व शरीर बळकट व कणखर बनविलें, ही गोष्ट फार चांगली झाली. शरीर पिळदार बन- बिल्यामुळे हल्लींच्या बऱ्याच बी. ए. प्रमाणे झुरुमुरु काडीपैलवान ग्रॅजुएट होऊन ते बाहेर पडले नाहींत. तर बी. ए. च्या परीक्षेत फर्स्ट क्लासांत पास होऊन पिळदार सतेज शरीराचे जवानमर्द ग्रेजुएट होऊन ते कॉलेजच्या बाहेर पडले. बी. ए. झाल्यावर त्यांनी एल्एल्. बी. चा अभ्यास सुरू केला. ते कॉलेजमध्ये असतांनाच त्यांची व देशभक्त प्रसिद्ध सुधारक प्रि. आगरकर यांची मैत्री जडली. दोघेही थोर मनाचे होते. दोघांच्याही मनांत स्वदेशाबद्दल अतिशय प्रेम वागत होतें. व दोघच्याही मनांत स्वत:ला श्रीमंत बनविणारी सरकारी नोकरी न घरेतां गरीबी पतकरून देशाची सेवा करण्याचें होतें. दोघेही मिल, स्पेन्सर या उदार साधु ग्रंथकारांचे भक्त होते. या साधु ग्रंथकारांच्या ग्रंथांनीं दोघांच्या मनांत स्वातंत्र्यप्रेम व जनसेवाप्रेम चिंवलें होतें. अशी ही जोडी बी. ए. ची परीक्षा पास झाल्यावर, पुढे काय करावें याबद्दल तासचे तास एकत्र विचार करीत बसत असे. इ. स. १८७९ सालीं याप्रमाणें ही बाळ- गोपाळांची जोडी कोणती देशसेवा करावी याचा विचार करीत असतां दुसरा एक थोर उदार देशभक्त सुखाची व श्रीमंत बनविणारी सरकारी नोकरी सोडून देण्याच्या बेतांत होता. त्याचें नांव विष्णु- शास्त्री चिपळूणकर. बाळांनों, या थोर पुरुषाचें चरित्र मीं तुम्हांला नुकतेच सांगितले आहे ते तुमच्या लक्ष्यांत असेलच. तेव्हां इतके सांगितलें म्हणज पुरे कॉ, या निबंधमालाकर्त्या विष्णुशास्त्र्यांनी इ. स. १८७९