पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७६)

आपल्या वयाच्या दहाव्या वर्षी बाळानें रत्नागिरी सोडली. तिला पुन:कधीही भेट देण्याचा प्रसंग त्याला आला नाही. आपला चरित्रनायक बाळ दहाव्या वर्षापासून जो पुणेकर बनला तो अखेरपर्यंत. आणि तसे त्याचें पुण्यावर प्रेमही विलक्षण होतें. ज्याप्रमाणे न्या. रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, प्रि. आगरकर व ना. गोखले कोठेही असले तरी त्यांचें प्रेम त्यांचे मन पुण्याकडे, त्यांना अत्यंत अभिमान पुण्याचा, त्याचप्रमाणे बाळाचेंही अखेरपर्यंत पुण्यावर अतोनात प्रेम होतं, आणि म्हणूनच योगायोगानें त्याला जरी मुंबईस मरण आलें तरी देखील मरणानंतरही आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीनें अनुयायांना प्रेरित करून त्यांचेकडून त्यानें स्पेशल गाडीनें आपल्या अस्थि लगेच पुण्यास आणविल्या. असो.
 बळवंतरावांचे वडील गंगाधरपंत यांचे गणित व संस्कृत हे विषय फार आवडीचे होते, हें वर सांगितलेंच आहे. ते त्यांनी आपल्या बाळास उत्तम तरहेनें शिकविले. यामुळे हे विषय बाळाचे अतिशय आवडर्डाचे झाले, व त्यांत तो अगदीं पटाईत झाला.
 पुण्यास आल्यावर बाळ हायस्कुलांत जाऊं लागला व वयाला सोळा वर्षे पुरीं होतांच मॅट्रिकची परीक्षा पास झाला. नंतर वडिलांच्या आज्ञेप्रमाणे तो डेक्कन कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी गेला. बाळ आतां कॉलेजमध्ये गेला, मोठा झाला तेव्हां आतां आपण त्याला बळवंतराव म्हटले पाहिजे.
 बळवंतरावांचे वडील गंगाधरपंत हे मोठे विचारी व धोरणी होते. मुलें कॉलेजमध्ये जातात. उरावर जाडर्डी जाडर्डी पुस्तकें घेतात. पुस्तकांत डोकें खुपसून बसतात व शेवटीं काडीपैलवान होऊन तरुणपणांतच म्हातारे होतात व मरतात हे त्यांना माहीत होतें. म्हणून कॉलेजमध्ये जातांनाच त्यांनीं आपल्या बळवंतरावांना बजावून सांगि तलें कीं 'बाळ, जसा अभ्यास करणें व ज्ञान मिळविणे हा विद्यार्थ्यांचा