पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७५)

बळवंतरावांना, लाडानें मांडीवर घेतले व आपण गळ्यांत नवीन जानव घातले. तेव्हां मजेनें या चार वर्षांच्या बळवंतरावांच्याही गळ्यांत त्यांनी एक जानवें दिलें अडकवून. ते पाहून बळवंतरावांना फार आ नंद झाला. नंतर जेवणाची वेळ झाली. गंगाधरपंत व बळवंतरावांचे आजोबा रामचंद्रपंत सोवळे नेसले. रामचंद्रपंताचे जवळ बळवंत राव जेवावयाला बसावयाचे. तेव्हां रामचंद्रपंत म्हणाले, बाळ तें गळ्यांतलें जानवें काढूनःठेव, तें ओवळें आहे' तेव्हां बळवंतराव म्हणाले, तुझीं व बाबांनी बरें जानवें गळ्यांत ठेवलें आहे ? तेव्हां मीही ठेवणार.' आतां या लहान बाळाला सांगितले तरी काय समजणार कीं त्याचें जानवें मंतरलेलें नसल्यामुळे व त्याची मुंज झाली नसल्यामुळे तें ओवळे व तें काढले पाहिजें हैं ? ' असो. बळवंतराव हट्ट धरून बसले की 'मी कांहीं जानवें काढणार नाहीं.' आजोबांनी पुष्कळ सांगून पाहिलें, पण बळवंतराव आपला हट्ट सोडीनात. पण जेव्हां गंगाधरपंत खूप रागावले तेव्हां स्वारीनें जानवें एकदांचें काढलें.
 अशीच पुनः एकदां गम्मत झाली. आपल्या या चरित्रनायक बाळास रत्नागिरी येथें त्यांचे वडील गंगाधरपंत यांनी मराठी शाळेत चातलें. एके दिवशीं यानें कांही एक क्षुल्लक अपराध केला असे वाटून याच्या शिक्षकानें 'छडी घेण्यास हात पुढें कर ' असा त्याला हुकूम केला. 'मीं कांहीं अपराध केला नाहीं तेव्हां मी कांहीं छडी घेणार नाहीं असा बाळानें रोखठोक जबाब दिला. त्यावर 'छडी घेत नाहींस तर वर्गीतून चालता हो. असा शिक्षकाने दुसरा हुकूम केला. त्याबरोबर स्वारीनें आपल्या पुस्तकांचें दप्तर उचलले व वर्गांतून निघून घरी आला. घरी गेल्यावर बाळानें सर्व हकीगत वडिलांना सांगितली. ती ऐकून 'आपला अपराध नसला तरी शिक्षकांची आज्ञा पाळावी ' असें वडिलांनी त्याला पुष्कळ सांगून पाहिले. शेवटीं मुलाचा सत्याग्रही स्वभाव ठाऊक असल्यामुळे वडिलांनी त्याला दुसऱ्या शाळेत घातलें. असो. आपला चरित्रनायक बाळ दहा वर्षांचा झाल्यावर पुण्यास आला.