पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७४)

सर्व मंडळीही त्याला बाळच म्हणावयाची. तसाच येथे प्रकार झाला. आपल्या चरित्रनायकाची आई त्यांना 'बाळ' म्हणू लागली, यामुळे साहजिकच घरांतील सर्व मंडळी यांना बाळ, बाळं असेंच म्हणूं लागली.
 पण बाळानों, तुझी म्हणाल, ' असें जरी असले तरी शाळेत नांव घालतांना असलें बाळ हें टोपणनांव कांहीं कोणी शाळेत दाखल करीत नाहींत. जे पाळण्यांतलें नांव असेल तेंच नांव शाळेत चालू होतं व तेंच मग कागदोपत्रीं चालू होतें.' बाळांनों, हे सर्व खरें, पण तसें येथें झालें नाही. याचे कारण आपले चरित्रनायक म्हणाले, 'माझ्या आईनें प्रेमानें जें माझें नांव ठेविलें तेंच शास्त्रांतील नांवापेक्षा मला अधिक प्रिय आहे व तेंच मी नेहमीं चालू ठेवणार.' तेव्हां आईवरील प्रेमामुळे व भक्तीमुळे आपल्या चरित्रनायकांनीं वासुदेव हे नांव टाकून दिलें व आईनें प्रेमानें ठेवलेलें बाळ हेच नांव चालू ठेवलें. आणि एकाअर्थी तेही योग्यच झालें. कारण प्रमाच्या माणसाला बाळ असे म्हणतात. आपले चरित्रनायकांवर सर्व देशाचें अत्यंत प्रेम तेव्हां सर्व देशाने त्यांना माझा बाळ असे प्रेमानें म्हणावें हें योग्यच आहे. असो. इतका खुलासा पुरे झाला.
 बळवंतरावजींचा जन्म झाला तेव्हां त्यांचे वडील गंगाधरपंत हे रत्नागिरी येथे शाळाखात्यांत असिस्टंट डेप्युटी होते. गंगाधरपंतांचे विशेष आवडीचे विषय गणित व संस्कृत हे होते. त्यांनी व्याकरणावरही एक पुस्तक लिहिले आहे.
 बळवंतरावजींचें बाळपण रत्नागिरीसच गेलें. बळवंतरावजी हे अगदी लहानपणापासून करारी व सरळ स्वभावाचे होते. एक गोष्ट अमक्याने केली तर ती आपल्यालाही करण्याचा हक्क आहे असे त्यांना अगदीं लहानपणापासून वाटत होते. याविषयीं एक गमतीची गोष्ट बाळांनो, मी तुझाला सांगतों. बळवंतराव नुकतेच कोठें चार वर्षांचे झाले होते. तो श्रावण महिना होता. त्या दिवशीं गंगाधरपंतांकडे श्राचणी होती. श्रावणी चालू असतां बळवंतरावांचे आजोबा यांनी या