पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)


हृदयांत कायमची वस्ती करून राहिले आहेत. त्यांचीं शरीरें मेली आहेत, पण ते थारेपुरुष स्वतः अमर झाले आहेत. चिरंजीव झाले आहेत. चिरंजीव म्हणजे अमर. आतां त्यांना मरणाचें भय उरलें नाहीं. आतां त्यांना थंडी वायाचें भय उरलें नाहीं, आतां त्यांना तहान भुकेचें दुःख होणार नाहीं. आतां त्यांना वाटेल तेथें वाटेल तितक्या लवकर जातां येईल, त्यांना आगगाडीचें तिकीट काढावयास नको. त्यांना आगबोटीचेंही तिकीट काढण्याची जरूर नाहीं. त्यांना कोणीही अटकाव करूं शकणार नाही. यापुढील त्यांचें सर्व आयुष्य आनंदांत जाणार. यापुढे ते आपलें सर्व आयुष्य तुमच्या आमच्या अंतःकरणांत ठेवून आपणाला चांगला मार्ग "व चांगले विचार दाखविण्यांत खर्च करणार. यापुढे स्वदेशाला ते भराभर चांगले दिवस दाखविणार. असले ते आजकालचे थोर पुरुष ' आहेत. बाळांनो, मी त्यांना नुसते 'थोर पुरुष थोर पुरुष' म्हणतों ही माझी चूक आहे, तीं नररत्नें आहेत.छे रत्नांची उपमा अगदींच अयोग्य. रत्ने कसलीं अगदीं मह ! त्यांनाच संभाळायला दुसरा हवा. पण हीं नररत्नें स्वतःचा बचाव करून शिवाय आपणा सर्वांचा बचाव करूं शकतात. हे 'आजकालचे थोर पुरुष' खरोखर ईश्वराचे अंशच होत. हे ईश्वराचे अंशावतार आहेत यांत संशय नाहीं; हे आजकालचे थोर पुरुष आपणाला इतके प्रिय झालेले आहेत, की आपण त्यांना जीव की प्राण असें मानतों. यासाठाच असल्या या आजकालच्या थोर पुरुषां'ना मी आपले 'पंचप्राण असेंच म्हणतों. हें पांच आजकालचे अत्यंत थोर पुरुष ' महाराष्ट्राचे पंचप्राण ' आहेत. या महाराष्ट्राच्या पंचप्राणांची कथा मीं तुम्हांसाठीं लिहून आणली आहे. या महाराष्ट्राच्या पंचप्राणांपैकी स्वार्थत्यागार्ने, देशभक्तीनें, विलक्षण धैर्यानें, अत्यंत साधेपणानें, अत्यंत शुद्ध वर्तनानें, अत्यंत साध्या राहणीनें व अत्यंत थोर बुद्धिवैभवाने ज्यानें आज चाळीस वर्षे आपणाला अगर्दी आपलेसें करून घेतलें होतें व सेकडून 'लोकमान्य' हें पद मिळवून घेतलें होतें, तो थोर पुरुष आपलें नाशवंत शरीर मुंबा- पुरींत समुद्राचे वाळवंटावर टाकून, आपल्या अंतःकरणांत कायमचा