पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो० बाळ गंगाधर टिळक.

 बाळांनो, आतांपर्यंत मी तुम्हांला न्या. रानडे, मालाकार चिपळूणकरप्रि. गोपाळ गणेश आगरकर यांची चरित्रें सांगितलीं. आतां प्रि. आगरकरांचे जिवलग मित्र व आगरकरांबरोबर ज्यांनीं डेक्कन कॉलेजमध्येच असतांना सर्व आयुष्य देशसेवेंत खर्च करण्याचा निश्चय केला व तो निश्चय शेवटपर्यंत कायम ठेवला अशा लोकमान्य टिळकांचें चरित्र सांगणार आहे.

जन्म व बाळपण.

टिळकघराण्याचें मूळ गांव चिखली या नांवाचें आहे. चिखली हैं गांव रत्नागिरी जिल्ह्यांत दापोली नांवाच्या तालुक्यांत आहे. टिळकघराण्याकडे चिखलीची खोती आहे. अशी जरी स्थिति आहे तरी टिळकांच्या पूर्वजांचा ओढा शेतीपेक्षा शिक्षणाकडेच पहिल्यापासून अधिक होता. लो. टिळकांचे घराणे चित्पावन ब्राह्मणांपैकी आहे. टिळक हे ऋग्वेदी असून आश्वलायन शाखेचे आहेत. या टिळकघराण्यांत रामचंद्रपंत अप्पा नांवाचे एक सुशील कर्मनिष्ठ गृहस्थ होऊन गेले. बाळांनों, हेच आपल्या चरित्र नायकांचे आजोबा मार्गे तुम्हांला विष्णुशास्त्री चिपळूणकरांचें चरित्र सांगितलें त्यावेळी एक गोष्ट सांगितली होती. ती ही कीं, ज्या मुलाला आजोचा असतात त्याची मोठी गंमत होते. म्हणजे त्याला बापाच्या कडक अमलांत रहावें लागत नाही. त्याचे लाड आजोबा वाटेल तितके पुरवितात.
 ज्याप्रमाणे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे आजोबा हरिपंत मामा हे विष्णुशास्त्री यांचें फार प्रेमानें पालन करीत असत, त्याप्रमाणेच